पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. ( २१३ ) विषयों बोलतो. ता० ६व७ नवंबर रोजी कर्नल फेर यांस विष घालण्याचा प्रयत्न केला होता, असे जरी पुराव्यावरून दिसते तरी ते दोन्ही प्रयत्न त्यांच्या समजण्यांत आले नाहीत; परंतु ता० ९ रोजी झालेला प्रयत्न मात्र त्यांच्या समजण्यांत आला. हा प्रयत्न रावजी हवलदार यानें केला. कर्नल फेर हे प्रत्येक दिवशीं सकाळी फिरून आल्यानंतर आपले आफीसाचे खोलीत जाऊन दाळींबाचें सरबत पीत असत. त्यांचे नोकरांपैकीं अबदुला नांवाचा नौकर हें सरबत तयार करीत असे. हे सरबत तो कोणत्या प्रकारे तयार करीत असे वगैरे बद्दलची हकीकत तोच आपल्यास येथे सां. गेल. तो सरबताचे गलास आपले यजमानाचे खोलीत टेबलावर ठेवीत असे. ह्या दि- वशीं नेहमीप्रमाणे सदई सरबत तयार केलें. ज्या खोलीत टेबलावर हे सरबत ठेविलेले असे ती खोली झाडण्याचे काम गोविंदा नांवाच्या हमालाचें असें. ह्या दिवशी स काळी गोविंदा काय करीत होता हैं तोच आपल्यास सांगेल. ह्मा खोलीत रावजीचें कोणत्याही प्रकारें काम नव्हतें तरी तो त्या खोलीत कागद किंवा पेनें नीट ठेवण्याचे मिषाने किंवा दुसरे अशाच सबबीने जात असे, व ह्मणूनच त्याचे जाण्याने कोणत्याही प्रकारें विशेष वहीम कोणासही आला नाहीं. ह्याची नेहमींची बसावयाची जागा ह्म- टली ह्मणजे बंगल्याचे बाहेरचे बाजूस परवींत शिपाईलोकांस बसण्याकरितां बांक मांडलेले असे ती होय. व या बांकावरून कर्नल फेर साहेबांचे खोलीत काय चालले आहे व सकाळी फिरून परत आल्यावर साहेब सरबत घेतात किंवा नाहीं हैं पाहण्यास चांगले सांपडत असे. ता० ९ रोजी सकाळी रावजीनें सरबताचे गलासांत विष घातलें हें त्याचेच साक्षीवरून दिसून येईल. हा विष घालण्याचा प्रकार पुढे लिहिल्याप्रमाणे होता. काही लोकांचे मार्फत तें विष त्याला मिळाल्यावर तें तो एका लहानशा बाटलीत घालून व चाटलीत पाणी घालून विषाच्या पुडीचे परिमाणू विरघळोव ह्मणून तो बाटली हलवीत असे. नंतर अशा रीतीने तयार झालेले विषाचे पाणी त्याने सरबताचे ग्लासांत ओतले. सरबताचे ग्लासांत विष होते या बद्दल बिलकूल शंका येणार नाहीं असे वाटतें. कर्नल फेर साहेबांनी त्या दिवशी सरब- ताचे दोन तीन घोंट घेतले व त्यांस सरबताची रुची आवडली नाही. ज्या डाळींबा पासून ते सरबत तयार केले ते दाळींबच चांगले नसावे, असे त्यास वाटून त्यांनी ग्लासांतील कांहीं सरबत खिडकीबाहेर फेकलें व नंतर ते काम करण्यास लागले. पुढें थोडक्याच वेळानें ता० ६ व ता० ७ रोजी ज्या प्रमाणे त्यांस भावना झाल्या त्याच प्रमाणे त्याही दिवशीं होऊ लागल्या. पूर्वीचे प्रसंगी सदई भावना प्रकृतीस जरा- सा अशक्तपणा आल्यामुळे झालेल्या असाव्यांत असे त्यांस वाटले; परंतु या प्रसंगी त्यांस वहीम आला आणि त्यांचे तोंडास पाणी येऊं लागले व मस्तक फिरूं लागले व या शिवाय ही दुसऱ्या कांहीं चमत्कारीक भावना होऊं लागल्या. त्याजवरून त्यांस वाटले कीं, आपले हातून कांही अपायकारक पदार्थ खाण्यांत आला असावा; असा वहीम आल्यावरून त्यांनी सरबताचे ग्लासाकडे न्याहाळून पाहिले तो ग्लासांत शेष राहिलेल्या सरबताचे बुडास कांहीं पदार्थ बसून राहिला आहे असे त्यांस समजल्यावर लागलीच