पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. जमादारास दिले. व ही रक्कम नरसू, रावजी, व जगा नांवाचा एक पखवाला या तिघांनी वांटून घेतली. रोसडेंट जेवायास बसले असतांना पंखा ओढण्याचे. कामावर शेवटीं सांगितलेल्या मनुष्याची योजना होती, ह्मणून अर्थातच त्यास जेवणा चे प्रसंगीं साहेबांचे बोलण्यांत काय गोष्टी निघत त्या त्याला समजण्याचा मार्ग अ. से. अशा वेळीं ह्याला ज्या काही गोष्टी कळत त्या तो काम अटपल्यानंतर एका कागदावर लिहून ठेवी व तो कागद त्याचेकडून रावजीस, रावजीकडून यशवंत रावास व यशवंतरावाकडून महाराजांस मिळत असे. सालम स्त्रारास पकडल्यानंतर त्याच्या घराचा झाडा घेतला त्यावेळेस एक कागदाचें पुडकें सांपडलें; व या पुड. क्यांतील कागद तपासून पहातां वर सांगितलेल्या पत्रांपैकी त्यांत बरीच पवें सांपड. लो, व त्यांपैकी तीन पर्ने तूर्त माझे जवळ आहेत; या तीन पत्रांपैकी एक तर जगा- च्याच हातचे आहे यांत शंका नाही. परंतु दुसरी दोन कोणाच्या हातची आहेत याचा अजून तलास लागला नाही. महाराजांचे ब्यारिस्टर हरकत घेतील ह्मणून या पत्रांतील मजकूर काय आहे हे मी सांगत नाहीं; परंतु ही पत्रे सादर करण्याचा प्रसं- ग येईल त्या वेळेस तो पुराव्या दाखल घेण्याविषयी आपले मी मन वळवीन अशी मला आशा आहे. त्याचे लग्नाचे सुमारास रावजीला ५०० रुपये देण्यांत आले हो- ते हें मी वर बोललोच आहे. त्याशिवाय तो नवसरीहून परत आल्यानंतर त्यास ४ ० ०।५०० आणखी दिले. ज्या वेळेस ह्या देणग्या त्यास देण्यांत आल्या. त्या वेळेस रावजी फार हल. क्या पगाराचा असूनही दागदागीने तयार करण्यांत त्याने पुष्कळ पैसे खर्च केले, व त्याचे खऱ्या ऐपती पेक्षां तो ज्यास्त खर्च करून विशेष थाटानें व डौलानें राहत असे, या सर्व गोष्टी शाबीत करण्याकरितां मी पुरावा आणणार आहे; त्याच प्रमाणे रावजी सरकार वाड्यांत जात असे त्यावेळी त्याचे बरोबर कधी कधी जगा पंखेवाला व कधीं कधीं काभाई नांवाचा एक मनुष्य असे जात असत हे मी पुराव्यावरून शा बीत करून देईन, दागिन्याच्या संबंधाची हकीगत त्याच्या ज्या मित्रांनी ते खरेदी केले व ज्या दोन सोनारांनीं ते घडविले त्यांचे साक्षीवरून ते शाबीत होईल. कर्नल फेर साहेबांबरोबर नवसरीस असतांना यशवंतरावाचे मार्फत नरसू यांस महाराजांकडून २५०रु० मिळाले. त्यानंतर नवसरीहून परत आल्यावर वर सांगितल्या प्रमाणें ८०० रुपयां पैकी त्याला हिस्सा मिळाला असे पुराव्यावरून शाबीत करून देईन. ह्या साक्षीदारावर कमी- शनचा विश्वास पटेल तर महाराजांनी स्वतः व आपले एजंटा मार्फत कर्नल फेरचे खाजगी नौकरांशी व रोसडेन्सींतील इतर नौकरांशीं अयोग्य रीतीनें दळण वळण ठेविलें होतें, व वर सांगितल्या प्रकारची माहिती महाराजांस दिल्याबद्दल ह्या लोकांस महाराजांकडून लांच देण्यांत आला होता ह्या दोन्ही गोष्टीबद्दल कमीशनची खात्री होईल. रावजीने स्वतः किंवा वर सांगितल्याप्रमाणें जगाने लिहिलेल्या पत्रावरून काय माहिती महाराजांस दिली हे कमीशननें सदहू पत्वें पुराव्या दाखल घेण्याचें कबूल केल्या- सत्याजवरूनच मिळेल. या शिवाय दुसऱ्या कितीएक महत्वाच्या मुद्यावर दुसरे किती एक साक्षीदार साक्षी देतील. आतां मी दुसऱ्या मुद्यांविषयीं ह्यणजे विषप्रयोग