पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. (२११ ) रून सालम स्वार व यशवंतराव जासूद यांचे मार्फत माराज व आया यांच्या भेटी होत असत, ही गोष्ट निर्विवादपणें शाबीत होते. ही पत्रे बनावट नसून खरी आहेत अशी कमिशनची खात्री होईल. व हीं पत्रे सांपडली कशी याजबद्दलची सर्व कच्ची हकीकत कमिशनास सागण्यांत येईल. (सदई पत्रे सादर करण्याचा प्रसंग येईपर्यंत त्यांतील मतलचाचे संबंधाने आडव्होकेट जनरल साहेबांनी काही बोलूनये असे सारंजन्ट बालंटाईन यांनी सांगीतल्यावरून त्यांनी तसे करण्याचे कबूल केले.) आयेच्या बरोबर एक दोन प्रसंगी शेख करीम नांवांचा रोसडेंन्स तील एक शिपाई हो गेला होता व त्यांस ही महाराजांकडून देणगी मिळाली. ह्या शिवाय पेद्रो डिसोजा या नांवा- चा कर्नल फेर साहेब यांचा एक बटलर होता व तो त्यांचे पदरी २५ वीस वर्षे होता;ह्यासही आपल्यास वर सांगितल्याप्रमाणे दोन विश्वासूक नौकरांचे मार्फत फितवि तण्याचा महाराजांनी प्रयत्न केला. व महाराजांची भेट घेण्याकरितां सरकार वाड्यांत जाण्याचे त्यानें नाकारिले तरी त्यास महारजांचे नौकर मार्फत बाबाशाई ६० रुपये देणगी दाखल मिळाले. महाराजांवर ठेविलेल्या आरोपांपैकी एका आरोपाचे संबं धाचा अशा तऱ्हेचा पुरावा आहे. आतां दुसऱ्या आरोपाच्या पुराव्यासंबंधी मी थोडक्यांत दिग्दर्शन करितों. कर्नल फेर साहेब यांस विषप्रयोग करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यांत आला होता ही गोष्ट कमिशनास कबूल होईल असे मी समजतों. व व त्याच प्रमाणे सदई दुष्ट प्रयत्नापासून कर्नल फेर साहेबांचा बचाव झाला तो केवळ इश्वराचे कृपेमुळे झाला असे कमिशनास वाटेल याविषयी मला शंका नाहीं. हा प्रयत्न गेल्या नवबंर महिन्याच्या ९व्या तारखेस झाला परंतु तशा प्रकारचे प्रयत्नः व्याच्या पूर्वी दोन दिवस झाले होते अशा विषयी आमच्या जवळ पुरावा आहे. रेसि. डेन्सींतील कांहीं पटेवाले त्यांत विशेष करून रावजी हवालदार याचे मदतीने प्रयत्न क.. रण्यांत आला. सन १८७३ चें कमिशन बसण्यापूर्वी ह्मणजे त्या सालाचे सप्टंबर महिन्यांत सालम व यशवंतराव यांचे मार्फत रावजी हवलदाराशी पहिल्याने बोलणे सुरू झालें त्या प्रसंगी सालमनें रावजीस सरकारवाड्यांत नेलें व तेथे कमिशनचें काम चालत असतांनां रेसिडन्सीत काय काय होते हैं अह्नांस कळवावे असे रावजीस सांगण्यांत आले व त्यानमाणे करण्याचे त्याने कबूल ही केलें. तू आपल्या मदतीस नरसू जमा: दार घे असे त्यांस सांगण्यांत आलें. कमीशनचे काम बडोद्यास चालू असतां त्याच्याच ह्मणण्याप्रमाणे रावजी सरकारवाड्यांत तिनदां गेला होता व त्या तिन्ही प्रसंगी त्यांची व महाराजांची समक्ष गांठ पडून उमयतांचें बोलणे झाले. त्याच प्रमाणे कमीशनचे काम संपल्यानंतर परंतु महाराज व कर्नल फेर नवसरीहून परत येण्याचे पूर्वी रावजी महा.. राजांला आणखी तीन वेळा भेटला व त्याच सुमारास आपले लग्न करण्याचा रावजी. चा इरादा असल्यामुळे त्यांत महाराजांनी यशवंतरावचे मार्फत ५०० रुपये दिले. नवसरीसही रावजीच्या आणि महाराजांच्या आणि त्यांच्या नौकर माणसांच्या गां.. ठी पडत असत. नवसरीहून परत आल्यानंतरही भेटी घेण्याचा हा प्रकार चालू होताच; व नवसररीहून परत आल्यावर थोड्यांच दिवसांनी यशवंतरावांनी ८०० रुपये नरसु