पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २१० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास, व्यांत चार मुद्दे आहेत. परंतु वस्तुतः पाहतां त्या चार मुद्याचे दोनच मुद्दे मानतां येतील. त्यांपैकी पहिला मुद्दा असा आहे की, महाराजांनी आपल्या नौकराचे मार्फत व स्वतांही गेसिडेंन्सीतील नौकरांस व रोसडेंन्सीशी संबंध असणाऱ्या इतर माणसांस वाईट कामाकरितां फितविण्याचा यत्न केला; व दुसरा मुद्दा असा आहे की महाराजांनी स्वतः व आपले नोकरांचे मार्फत आपले दरबारांतील ब्रिटिश रोमेडेंटास विष घालण्याचे प्रयत्न करण्याचे काम कांहीं इसमांस उत्तेजन दिलें; नुकत्याच वाचलेल्या जाहिरनाम्यांत कांही फार महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला आहे परंतु त्याजविषयों भी ज्यास न बोलतां त्याचा उपयोग काल निदर्शना करितांच करितों. सन १८७३च्या आक्टोबर महिन्याचे २३वे तारखेस हिंदुस्थान सरकारच्या हुकमावरून बडोद्याचे कमीशन जमले होते व या कमीशनच काम पुढे दोन महिने चालले होते त्या दोन महिन्यांत यशवंतराव जासूद व सालम स्वार या नांवाचे महाराजांवे दोन विश्वासूक चाकर होते, त्यांचे मार्फत रेसिडेन्सींतील नौकरांस प्रथम फितविण्याचा उपक्रम सुरू झाला. काल सरकारी नौकरापुरतांच लागू होता असे नाहीं, तर रोसडेंट कर्नल फेअर च त्यांची बायको यांचे खाजगी नौकरांसही फितवण्याचा प्रयत्न ह्याच वेळी चालू झाला. कर्नल फेअर साहेबांचे बायकोपाशी आमिना नांवाची एक आया होती, व ती त्यांचे पदरीं फार दिवस असून त्यांचे विश्वासाची होती; ही आया शहरांत जाऊन महाराजांस भेटत असे असे तिच्याच तोंडून आपल्यास कळेल; महाराजांस एकंदर तिनदां भेटली त्यांपैकी प्रथम प्रसंग १८७३ चे कमिशनचें काम चालू असतां झाला; दुसरा प्रसंग सदहू कमिशनचें काम आटपल्या नंतर आणि महाराज व रेसिडेंट सन १८७४चे मे • महिन्यांत नवसरीहून परत आल्यावर घडून आला; व तिसरा प्रसंग आयेच्याच लण- ण्याप्रमाणे रमजान महिन्यांत ह्मणजे कर्नल फेयर यांस विषप्रयोग होण्याचे पूर्वी थोडेच दिवस अगोदर घडून आला; या तिन्हीही प्रसंगी तिची व महाराजांची समक्ष गांठ पडन उभयतांचे बोलणे झाले. या तिन्ही प्रसंगीही ती सरकार वाड्यांत गेली होती अशा विषयी पुरावा तिजबरोबर गेलेल्या कांहीं लोकांचा आहे, तो आपल्यास ●सादर केला जाईलच. तिसऱ्या प्रसंगी महाराजांचें व तिचे विशेष महत्वाचे बोलणे झालें. व त्या बोलण्यांत काय निष्पन्न झाले हे आपल्यास मी न सागतां तिच्याच तोंडून ते आपल्यास कळेल तें ठीक होईल. पहिल्या प्रसंगानंतर तिला महाराजांकडून कांहीं देणगी मिळाली असे दिसत नाहीं; परंतु दुसरे प्रसंगी मात्र तिला शंभर रुपये यशवंतराव जासुदाचे मार्फत मिळाले. व तिसऱ्या प्रसंगी पन्नास रुपये मिळाले ह्या सर्व हकीकतीबद्दल पुरावा तिचा नवरा शेख अबदूल हा देईल व त्याशिवाय विशेष बळकट असा हो पुरावा आपल्यास सादर करण्यांत येईल. ह्या आयेला पहिल्याने पकडल्या नंतर तिच्या घराचा झाडा घेतांना चार पत्रे सांपडली; तो हा लेखी पुरावा होय. ह्या चार पत्रांपैकी दोनपत्रे आयेनें आपल्या नवन्यास लि हिलेली आहेत व दुसरी दोनपवें त्याने तिला लिहिलेली आहेत; व ह्या चार पांव.