पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. (२०९ ) महाराजांच्या राण्या, व श्रीमंत सौ० लक्ष्मीबाई सहेब यांचा पुत्र सयाजीराव यांच्या तर्फे मुकदम्यावर नजर ठेवण्याकरितां बारिस्टर जॉर्ज टेलर हे होते. महाराज यांस प्रतिबंध केल्यानंतर दादाभाई नवरोजी, बाळा मंगेश, आणि हुर- मतजी वाडिया, हे सद्गृहस्थ लागलीच बडोद्यास येऊन दाखल झाले होते. महा- राजांनी या लोकांस आपल्या चाकरींत घेऊन त्यांचा उलटा उपमर्द केला होता, व सर लुईस पेली आल्या बरोबर त्यांस राजीनामा देण्याचा प्रसंग आणिला होता. तथापि त्या सद्गृहस्थांनी ते अपकार मनांत न आणितां महाराजांचें आपण थोडें दिवस अन्न खाले आहे, सचच त्याबद्दल त्यांची आपल्या हाताने होईल ती सेवा क रून अनृणी व्हावे, असे मनांत आणून महाराजांस योग्य प्रकारचें सहाय करण्यासा ठीं ते मोठ्या उत्सुकतेनें बडोद्यास आले होते; परंतु सारजंट बालंटाईन यांनी त्यां च्या सेवेचा अनंगिकार केल्यामुळे त्यांचे मनोरथ सफळ झाले नाहीत हे आपल्यास पुढे कळून येईल. जे सज्जन ते सज्जनच. त्यांचा स्वभाव चंदनाप्रमाणे आपल्या- स झिजवून घेऊन जो आपल्यास अपकार करतो त्यांजवर देखील ते उपकार करता- त. ती चंदनाची उपमा दादाभाई प्रभृती मंडळी यांत चांगली शोभते. हादूर काजी शाहाबुद्दीन हे दादाभाई यांजबरोबर राजीनामा देऊन मुंबईस गेले. परंतु संकेताप्रमाणे सर लुइस पेली यांच्या बोलावण्यावरून लागलीच तिसरे किंवा चौथे दिवशीं परत येऊन महालानीहाय सरसुभे बनले. यामुळे त्या गृहस्थांस दादाभाईच्या यशाचे विभागी होण्याचा योग साधला नाहीं, याबद्दल वाईट वाटतें. खान ब कोर्टाचें काम सुरू होण्यापूर्वी श्रीमंत मल्हारराव महाराज यांस सर लुईस पेली यांनी कोटांत आणवून त्यांच्यासाठी कोर्टाचे डावे वाजूस जागा तयार केली होती तेथें बसविलें. आणि आपण कोर्टाच्या उजवे बाजूस बसले. माझें राज्य बुडालें तर बेहेत्तर आहे, परंतु मी माझा हक्क सोडून ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधीच्या डाव्या बाजूस कधींही बसणार नाहीं, असा महाराजांनी कृतसंकल्प केला होता, असें आह्मी मार्गे लिहिलेंच आहे, त्याबद्दल महाराजांस अनुताप व्हावा, ह्मणून सर लुईस पेली यांनी बुद्ध्या तसे केले होते, असें अनुमान केले तर संभवनीय आहे. कारण त्यांचा स्वभाव कांहीता छळक होता, असे त्यांच्या कांहीं कृष्णंवरून दिसून आले तें वर लिहिले आहे. कमिशनचे सभासद आपआपल्या स्थानी येऊन बसल्या नंतर हिंदुस्थान सरका या तर्फे काम चालविण्याकरितां नेमलेले बारिस्टर स्कोवल साहेब यांनी कज्याची सुनावणी करतांना भाषण केलें तें असें.- बडोद्याचे गायकवाड मल्हारराव महाराज यांजवर हिंदुस्थान सरकारानें जे आरो- प आणिले आहेत त्या आरोपाचे संबंधानें जो पुरावा माझे जवळ आहे त्याचे साक्षी- दार सुरू होण्यापूर्वी थोडक्यांत दिग्दर्शन करतो. नुकतांच जो जाहिरनामा वाचला आहे त्याजवरून कमिशनचे ध्यानांत आलेच असेल कीं, संशय उप्तन्न होण्यासा- रखा महाराजांवर पुरावा हिंदुस्थान सरकारचे पुढे आणला गेला असून त्या पुरा २४