पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जुन्या राज्यपद्धतीचे वर्णन व त्यांत पुढे फेरबदल महाराजाजवळ इतके वजन होतें कीं, त्यांजवर व त्यांच्या कामदारावर तर काय, पण त्यांच्या अगदी हलक्या प्रतीच्या चाकरावर देखील दरबारांत फिर्यादी करणे म्हणजे आपणावर मुद्दाम एक नवे मोठे संकट ओढून आणल्याप्रमाणें होतें. लोकांचे म्हणणे असे होतें कीं, चोरीस गेलेला रयतेचा माल एक वेळ पोलिसाच्या हाती लागल्यावर तो मालकास परत मिळाला होता असे एकही उदाहरण सांपडणार नाहीं. कोणी तर धायभर यांच्या जुलमाची अशी कांही विलक्षण तन्हा सांगतात की, ती ऐकून आपल्या आंगास शहारे येतात. धायभर यानी आपल्या चाकरास सोन्याचा गोफ किंवा कडे वगैरे जिन्नस देऊन तो कोणाच्या येथे गहाण ठेविण्यास किंवा विकण्यास सांगावें, आणि मग त्याजवर लटुपटूचा चोरीचा आळ आणून त्यास थोडासा मार द्यावा आणि त्याने ज्या मनुष्याकडे तो दागिना ठेविला असेल त्याचें नांव त्याजकडून वदवावें; आणि मग त्या मनुष्यास धरून आणून त्याजपासून तो जिन्नस हिसकून घ्यावा, आणि त्या चाकरास मार खाल्याबद्दल कांहीं मोबदला देऊन ते रुपयेही त्याजपासून घ्यावे, आणि त्या गहाण ठेविणारास अथवा विकत घेणारास रडत वाटे लावावें. यांत अतिशयोक्ती किती आहे हे सांगवत नाही, परंतु त्या वेळच्या स्थितीप्रमाणे पाहिले असतां अगदी मिथ्योक्ती नाहीं असे मानण्यास कांहीं प्रत्यवाय नाही. , मल्हारराव महाराज यांच्या पूर्वजांचे दोष बाहेर काढावे या बुद्धीने पूर्वीची राज्यव्यवस्था सांगितली नाहीं. त्याबद्दल त्या वेळच्या राजावर कोणी दोषारोप करील तर आम्ही त्यास अविचारी असे स्पष्ट म्हणूं. जगाच्या प्रारंभी या मनुष्य प्राण्याची स्थिति अगर्दी पशुतुल्य होती म्हणून आज आपण आपल्या पूर्वजांस मूर्ख म्हणण्यास तयार झालो तर जो वेडेपणा आपल्याकडे येईल तोच गायकवाडाच्या पूर्वजांस दोष देणाराकडे येईल; कारण त्या वेळेस राजास व दरबारी लोकांस राज्यकारभार चालविण्याची जी रीत माहित होती त्याप्रमाणे ते कारभार चालवीत असत. ज्याने कधीं सूर्य पाहिला नाही त्याने जर एकादे अंधुक नक्षत्रास सूर्य म्हटले तर त्यांत नवल तें कसचें. त्या वेळच्या राजांच्या मनांत बुद्धि- पुरःसर आपल्या प्रजेस दुःख द्यावयाचें मुळींच नव्हते. त्यांस जी कांहीं राजनीति माहित होती तिचा तो स्वाभाविक परिणाम होता. आनंदराव गायकवाड यांच्या कारकीर्दीत सर्व राज्यकारभार रेसिडेन्सींत चालत होता, तेव्हां कोठें जुन्या राज्यरीतींत फेरफार होऊन नवी राज्यरीति स्थापित झाली होती? मागून चालत आलेल्या वहिवाटीप्रमाणेच सर्व व्यवस्था चालत होती. त्याबद्दल आपण जर रोसेडेंट साहेब यांस दोष देऊ शकत नाहीं तर त्या वेळच्या राजास कसा देता येईल. सयाजीराव महाराज यांची कारकीर्द सर्वांस चांगली स्मरत आहे, व महाराजांविषयीं प्रजेच्या मनांत किती राजभक्ति आणि अनुराग होता हेही सर्वांच्या लक्षांत आहे. त्याचे कारण त्या राजाचें पवित्र मन होय. प्रजेवर जुलूम करून त्यांचें द्रव्य हरण करावें, किंवा त्यांस त्रास द्यावा, किंवा त्यांजवर कोणी जुलूम करील नये, असे त्या सत्पुरुषाच्या मनांत कधीच वागले नवते. ण्यासाठी नित्य दरबार भरवून बसत असत, व न्याय करीत, ते तर त्यांचे पारिपत्य करूं लोकांच्या फिर्यादी ऐक- परंतु त्यांत जे काही दोष