पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. अमुक एक नियमीत रक्कम देण्याचें कबूल केल्यावरून, सारजंट बालंटाईन यांस आणविण्याचे ठरले. सारजंट बालंटाइन हे आपल्या चिरंजिवासुद्धां तारीख १९ फेब्रुवारी सन १८७५रोजी मुंबईस येऊन, तारीख २० फेब्रुवारी रोजी बडोद्यास गेले. मुंबईच्या लोकांनी बडोद्यास जातांना ज्या ज्या स्टेशनावर त्यांची गाडी थांवली, तेथील मोया पदवीच्या लोकांपासून लहान पदवीच्या लोकांपर्यंत सर्वांनी त्यांचा फार उत्तम सत्कार करून मल्हारराव महाराजांविषय आपला किती अनुराग होता, हें प्रगट करून दाखविलें. आणि मल्हारगव महाराज यांस त्यांची मजा अगदी कंटाळली आहे, आणि सर्व लोकांची इच्छा आहे कीं, बडोदें संस्थान इंग्रज सरकारांनी खालसा करावें, अशा अप्रयोजक विचारांच्या वर्तमान पत्रकर्त्यांस अधोवदन करण्यास लाविलें. बडोद्याच्या स्टेशनावर तर त्यांचा सत्कार फारच उत्तम रीतीचा झाला. सर्व सर- दार व बडे लोक त्यांस सामोरे आले होते. व सामान्य प्रतीच्या लोकांची इतकी ग- दर्दी झाली होती कीं, सारजंट बालंटाईन यांचें तोंड कोणाच्या दृष्टीस पडत नव्हतें. तारीख २३ फेब्रुवारी सन १८७५ रोजीं कमिशनच्या कामास सुरुवात झाली. फिर्यादीचें काम चालविण्याकरितां हिंदुस्थान सरकारांनी मुंबईचें ऑडव्होकेट जनरल स्कोबल साहेब, आणि इनव्हिऱ्यारिटी यांस नेमलें होते; व त्यांस मुकदमा समजून देण्यास सरकारी आटर्नी मिस्तर हार्न, क्लीव्हलंड, आणि ली मारनर यांची नेमणूक केली होती. महाराजांच्या तर्फे:- बारिस्टर. १ सारजंट बालंटाईन .१ ब्रानसन. १ परसेल. आटर्नी. १ जेफरसन. १ पेन. -- वकील. १ शांताराम नारायण.. रावसाहेब वासुदेव जगनाथ.