पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. ( २०७ ) सर टीच्या वाट्याला आली नसती, असा कितीएक सूज्ञ लोकांचा दृढ समज आहे. या कमिशनांतील देशी गृहस्थांत मुत्सद्दी काय ते तेच होते. सर रिचर्ड काउच हे या कमिशनाचें अध्यक्ष असून हें कोर्ट कोणत्या ठिकाणी, केव्हां भरावें, याचें काम कोणत्या रितीने चालवावें, दोन्ही पक्षकारांकडील दस्तऐ- बजीं अथवा दुसरा कोणता पुरावा कबूल करावा, अथवा नाकबूल करावा. वगैरे गोष्टींचा सर्व अधिकार त्यांजकडेस सोपविला होता. महाराजांवर जे आरोप ठेविण्यांत आले होते, त्या खेरीज दुसऱ्या कोणत्याही गोष्टीविषयों या कमिशनाने चौकशी करूंनये, व दुसऱ्यास त्या गोष्टी कमिशनापुढें आणण्यास परवानगी देऊनये, अशी कमिशनच्या अधिकाऱ्यांची मर्यादा केली होती. कामेशनच्या सदस्यांपैकी कोणी सदस्य कोणत्याही कारणाने गैर हजर असेल तर चौकशीचे काम बंद न ठेवितां बाकींच्या सभासदांनी काम चालवावे असा नियम केला होता. कमिशनाने फक्त चौकशी करून हिंदुस्थान सरकारास रिपोर्ट करावा इतकाच यांस अधिकार होता; आणि शेवट निर्णय करण्याचा अधिकार हिंदुस्थान सरकारांनी आपल्या हातांत ठेविला होता. मुंबई सिव्हिल सरव्हिसांतील जान जारडीन यांस या कमिशनचे सेक्रेटरी नेमिलें होतें.. श्रीमंत महारान मल्हारराव गायकवाड सेनाखास खेल समसेर बहादर यांजवर चार आरोप ठेविले होते ते हे:-- १ मल्हारराव गायकवाड यांनी स्वतः व आपल्या मुखत्यार मार्फत कर्नल फेर यांचे चाकर अगर रेसिडेन्सी संबंधाचे नौकर लोक यांजशीं अयोग्य कामास्तत्र गुप्त संबंध ठेविला. २ त्यांनी त्यांपैकी कांहीं नौकरास लांच दिला अगर देवविला. ३ असा गुप्त संबंध ठेविण्यांत व लांच देण्यांत त्या चाकरांचा उपयोग कर्नल फेर यांजवर हेरांप्रमाणेंकरून अयोग्य रीतीने गुप्त गोष्टींची माहिती मिळविणे, व कर्नल फेर यांस इजा करणें, अगर विषाच्या योगाने त्यांस नाहींसें करणे हा त्यांचा उद्देश होता. आणि, ४ मल्हारराव गायकवाड यांच्या सूचनेवरून कर्नल फेर यांस वास्तविक विष प्रयोग झाला. मुंबई हायकोर्टाचे एक विश्रुत वकील शांताराम नारायण, व रावसाहेब वासुदेव जगन्नाथ, यांस महाराज मल्हारराव यांनी आपल्या तर्फे काम चालविण्याची सदर तयारी करण्याविषयीं सांगितलें होतें. वर लिहिलेल्या वकिलांच्या व जेफरसन आणि पेन यांच्या मसलतीनें इंग्लंडांतील कोणी प्रख्यात बारिस्टर आणण्या विषयीं महाराजांनी विचार केला परंतु या बद- लचा खर्च देण्याविषयीं हिंदुस्थान सरकारांनी पहिल्यानें बरेच अढेवेढे घेऊन शेवटीं