पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा पैरा इतिहास. - जयपूरचे राजे श्रीमंत महाराजा रामसिंगजी हे सूर्य वंशांतील अयोध्येचा राजा रामचंद्र यांचे वंशज अशी कथा आहे. श्रीरामचंद्र यांचा कनिष्ट पुत्र कुश, या- चा वंशज नळराजा, त्यापासून या जयपूरच्या राजगादीचा स्थापक घोळाराय हा च- वतीसावा पुरुष यानें ९५७ चे साळांत ही जयपूरची गादी स्थापन केली. त्यांस आज हजारवर्षे होत आलीं इतकें हैं प्राचीन घराणे आहे....ह्या घराण्यांत पूजन, पृथीराज, बहारमा, भगवानदास, मानसिंग, जयसिंग, इत्यादि मोठे पराक्रमी आणि शहाणे राजे होऊन गेले. दिल्लीचा बादशहा बाबर यांजशी या राजघरा- ण्याचा प्रथम संबंध जडला. आणि भगवानदास याने आपली मुलगी अकबराचे मुलास दिल्यापासून दिल्लीचे बादशहाचे घराणे यांचे शरीरसंबंधों झालें. अकबर बाद- शहा यांच्या कारकीर्दीत मानसिंग यानें मोठे मोठे पराक्रम करून, व नवे मुलुख जि कुन दिल्लीच्या राज्यास जोडळे. बंगाल, बहार, दक्षण, आणि काबूल इतक्या प्रांता- ची यांजकडेस सुभेगिरी होती. असें हें जयपूरच्या राजाचें घराणे मोठे विख्यात असून रामसिंग महाराज यांनी बंडाच्या वेळेस इंग्रजसरकारांस फार उत्तम सहाय करून, त्यांजवर मोठे उपकार केले आहेत. आणि आपल्या राज्यांत उत्तम सुधारणा. करून आपली कीर्ति अमर केली आहे. अशा योग्यतेचे आपल्या बरोबरीचे राजे आपला न्याय करण्यासाठी लॉर्ड नार्थ ब्रूक यांनीं कमिशनांत नेमळे याबद्दल मल्हारराव महाराज यांस खरोखर मोठे समा धान वाटलें होतें, यांत संशय नाहीं. •रावराजे दिनकरराव राजवाडे यांची योग्यताही तशीच मोठी आहे. शिंदेसरका.. रच्या दरबारांत ते पूर्वी सामान्य प्रतीचे कारकून होते. त्यांनी आपल्या अकलेने आपणास इतक्या मोठ्या योग्यतेस आणलें. सांप्रतच्या प्रसगी मोठ्यामोठ्या जहागिरी मिळवून संस्थानिकाच्या पदवीस येऊन बसणे किती दुर्घट आहे, यांजकडे आपण लक्ष दिले म्हणजे राजवाडे यांच्या करतृत्व शक्तीचे हुबेहुब चित्र आपल्या नजरे समोर उभे राहतें. आयत्या पिठावर रेघा ओढून आणि ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यां चे थुंकें झेलून उत्कर्षास आलेले असे देशी गृहस्थ बरेच आहेत परंतु आह्मास जशी राजवाडे यांची किमत आहे, तशी त्यांची नाहीं. आपल्या पराक्रमानें जो उत्कर्षास येतो, संकटकाळ आला असतांज्याची बुद्धी डगत नाहीं, आणि केवळ स्वार्थपरायण होऊन लो- कांच्या दारोदार भटकत फिरत नाहीं, आपल्या पराक्रमानें जें कांहीं आपण मिळविलें त्यांत च संतोष मानून राहतो, तोच खरोखर मोठा मनुष्य; आणि त्या दृष्टीने पाहिलें अस- तां रावराजे दिनकरराव यांची योग्यता फार मोठी आहे. शिंद्यांची दिवाणगिरी सो- डल्या नंतर ते कोणत्याही राजाच्या राज्यकारभारांत पडले नाहीत इतके ते निस्पृह असून देशीराज्यांचा त्यांस किती अभिमान आहे, हे याच कमिशनच्या कामांत त्यांनीं जो आपल्या मनाचा स्वतंत्रपणा दाखविला त्यावरून आपणास कळेल. खरोखर दिनकरराव यांनी मल्हारराव महाराज यांस अपराधी ठरविले असते, तर बडोद्याची दिवाणगिरी