पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. च प्रकारची दुसरी व्यंगें अवश्य अततातच. आणि त्यांत देशी राज्यास ह्या गो- ष्टी विशेषेकरून लागू आहेत. त्याची राज्यस्थीति अशी काही विलक्षण आहे की, त्या यो गानें ते हलक्या मनाचें बनून जाऊन त्यांचे विचार अगदी अप्रबुद्धपणाचे होतात. त्यांस पुष्कळ रिकामा वेळ सांपडतो, आणि चेनबाजी करण्याची साधने त्यांना अनुकूळ असतात. दरारा दाखविण्यास इंग्रज सरकारचे रेसिडेंट त्यांच्या दर- • बारी असल्यामुळे त्यांचे सरदार व प्रजा यांस आपल्या राज्यावर योग्य दाब ठेवितां येत नाही. त्यांत बडोद्याच्या बाबतींत तर विशेष दुःखाची गोष्ट घडून आली आहे. कर्नल फेर यांच्या पूर्वी बडोद्यास जे जे रोसडेंट झाले, त्यांनी आपले काम बरोबर बजाविलें नाही. आपल्या सलेस राजांनी मान द्यावा, असे त्यानीं काही केले नाहीं, व कधी कधी तर सलाच दिली नाहीं. मनमानेल त्याप्रमाणे वाग ण्यास त्यांस उलटें उत्तेजन दिलें आणि वेळोवेळी त्यांचा राज्यकारभार चांगला आहे, असे सरकारांस रिपोर्ट केले, यामुळे हल्लींचा हा भयंकर प्रसंग उपस्थित झा ला आहे. पुण्याच्या लोकांनी वरील कलभ लिहितांना टकरसाहेब यांचे हुबेहुब अनुकरण केले आहे. कर्नल फेर यांच्या पूर्वी जे जे रेसिडेंट झाले त्यांनी आपले काम बरो- बर बजाविलें नाहीं, इतकाच त्यांजवर दोष ठेऊन ते थांबले नाहीत; मनमानेल त्या- प्रमाणे चाळण्यास त्यांनीं राजांस उलटें उत्तेजन दिले, असें देखील झटले आहे. या ह्मणण्यास त्यांस काय प्रमाणें सांपडली असतील हे आह्मांस समजत नाहीं. आम. च्या मतें तर बडोद्याच्या रेसिडेंटांची सत्ता त्यांच्याच सरकारानें किती मर्यादीत के. ली होती व तहनाम्या अन्वयें बडाद्याच्या राज्याचा इंग्रज सरकारांशी कोणत्या प्रका रचा संबंध आहे, याविषयीं पुण्यांतील प्रमुख लोकांस चांगली माहिती नव्हती, ह्मणू- न त्यांनी तिसऱ्या कलमांत तसे लिहिले आहे. कर्नल फेर यांच्या पूर्वी जे रेसिडेंट झाले त्यांचे वर्तन जर या अर्जदार लोकांस अभिमत नाहीं, तर कर्नल फेर यांनी जें वर्तन केले ते त्यांस पसंत आहे काय ? तहनाम्याचें महत्व राखन रेसिडेंटांनी ब डोद्याच्या राजांबरोबर कसे वागावें, याविषयीं अर्जी तयार करणार प्रमुख लोकांस एक मसुदा तयार करण्यास सांगितला तर त्यांची खातर जमा होईल कीं, • वक्तु सूकरं अध्यवसितुं दुष्करं चौथ्या कलमांत त्यांनी गवरनर जनरल यांची प्रशंसा केली आहे. पूर्वी सरकारां- 4. Your memorialists admit with heart-felt gratitude that your Excellency's Government in all your dealings with Baroda have shown the greatest forbearance and a most liberal-minded determination to adhere to the merciful spirit of the Queen's Proclamation. On previous occasions when similar interference was found. • necessary in respect of the chiefs and princes of Oude, Punjab, Sattara, Kolhapo or, Touk &c. the British Government laid itself open to much popular odium and mis- construction of its motives by harsh and one-sided proccedings. The princes wers de- posed on the one-sided reports of political agents without any independent inquiry, with-