पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी (१९५ ) ठेविले होते, यामुळे त्यांच्याने काही उद्योग झाला नाही. आणि बाकीच्या लोकांस आपण जर कांहीं हालचाल केली तर अशीच आपली दशा होईल, अशी दहशत बसली. तेव्हां वर तोंड करतो कोण. जो तो आप आपल्या काळ- जींत चूर होता. काही सरदार लोकांस गादी संरक्षण करण्याचा हक्क देऊन, व मीर कमालुद्दीन हुसेनखान यांस तीन हजार स्वारांचे सुभे बनवून संतुष्ट केले होतें. माठे सयाजीराव महाराज यांचे कारकीर्दीत या तैनाती स्वारांचा अधिकार इं. ग्रजसरकारांनी आपलेकडेस घेतला होता तेव्हां देखील त्यांचे सुभेगिरी याच घरा- ण्यांतील सरदारास दिली होती. राज्यक्रान्तीच्या प्रसंगी अथवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या प्रसंगी राज्य तील वजनदार लोकांस आपल्या बाजूस करून घेण्याचे इंग्रज सरकारचे एक मोठे शहाणपणाचें कारस्थान आहे. एखाद्या मुलाच्या हातांत गुळ खोबरें देऊन त्याचे अलंकार मग खुशाल बुचडून घेतां येतात त्याप्रमाणे आमच्या देशांतील बडे बडे सरदार यांस सहज भूरळ घालतां येते, तेव्हां ले 17 मल्हारराव महाराज यांचे काय होतें याजकडे चित्त देतात कशाला? त्यांत मल्हारराव महाराज यांचे तं प्रतिपक्षीच बनून फसळे होते आणि अशा मो- ठ्या कचाटीच्या राज प्रकरणांत कोणते उपाय योजिले पाहिजे होते, याविषयीं वि. चास ज्ञान तरी काय होते ? मल्हारराव महाराज यांच्या संबंधाने सगळ्या गु. जराथेनें काही केले नाहीं, असें ह्मटलें तरी चालेल. आतां त्या लोकांच्या मनाला ही गोष्ट परकाष्ठेची लागली होती, व त्याबद्दल ते पराकाष्ठेचे दुःखी होते, व म ल्हारराव महाराज दोष निर्मुक्त होऊन बडोद्याचे राजे व्हावेत, अशी त्यांची उत्कट इच्छा होती हैं खरें, परंतु उगीच दुःख कल्यानें व मनोरथ केल्याने काय होते ? जो प्रसंगा नुरूप सहाय करतो तोच खरा मित्र व हितकर्ता. पण आपल्या देशांतील लोकांची परंपरागत चाल झटली म्हणजे संकटग्रस्त मनुष्याच्या मित्रांनी उदास होऊन रडत बसावें, आणि शत्रूंनी आनंद मानून हसत बसावें, 'यथा कालाहिनोयस्तो भेको, दंशानपेक्षत' या श्लोकार्थाच्या अर्थाममाणे आपल्या देशांतील लोकांची थिती आहे. आपण कालसर्पानें ग्रस्त झालो आहोत असे पाहतात तथापि बेडकाप्रमाणें दुसऱ्याच्या नाशाविषयी प्रयत्न आहेच. आपल्यांत एकी नसल्यामुळे आपल्या दे.. शांतील मोठमोठा राज्यें रसातळास गेली हें धडधडीत पहातात तरी मल्हारराव महा- राज यांचें राज्य बुडविण्यास कंबर बांधून तयार आहेत. शाबास आहे त्या लॉई नॉर्थ ब्रूकाची कीं, बडोद्याच्या राष्ट्रांतील दृष्ट लोकांनी बडोद्याचें राज्य इंग्रज सर- कारांनी तोंडात टाकावें अशीं संधी साधून दिली असतांहा त्या महामनस्क सत्पुरु. षाचे मन मोहांत पडलें नाहीं ! ● महाराष्ट्र देशांतील लोकांनी मात्र कायावाचामनेंकरून, आणि धनेंकरून • मल्हारराव महाराज यांच्यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न मोठ्या शहाण, जानें केला. त्यां त पुणे शहर या गोष्ठींत प्रमुख होतें, आणि त्यात कै गणेश वासुदेव जोशी प्र भूती मंडळी यांचे प्रयत्न प्रबुद्ध विचाराने युक्त आणि समितच्या इंग्रज सरकारच्या Oª