पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. अशी विनंती करण्यांत आली होती की, महाराज यांस राणीसाहेब यांच्या सातव्या पलटणीच्या लोकांच्या पाहन्यांत न ठेवतां त्यांस त्यांच्या सरदारांच्या पाहायात ठेवावें, याबद्दल महाराजांस त्यांनी असे सांगितलें कीं, तुमच्या सरदारांच्या पहाऱ्यांत अस ण्यापेक्षां ब्रिटिश सरकारच्या पाहयांत तुझी असल्यानें तुमचे जीवित जास्त सुरक्षित राहील. आणि सरदार लोकांस असे उत्तर दिले कीं, राणीसाहेब यांच्या सातव्या पलटणीस वुइंडसर येथें वद राणीसाहेब यांचा पहारा करण्याचा हक्क आहे. या सांगण्याचें तात्पर्य असे दिसतें कीं, या पलटणीच्या पहाऱ्यांत महाराज यांस ठेवण्यांत आह्मी एक त्यांस मोठा मान दिला आहे. मल्हारराव महाराज हे मोठ्या उंच पदवीचे कैदी होते, यांत कांहीं संशय नाही. आणि बादशाही सातव्या पलटणीच्या पहाऱ्यांत त्यांस ठेवले, त्यांत त्यांस एक मोठा मान देण्याचा उद्देश असेल, तर सर लुईस पेली यांच्या भाषणाविषयीं कांहीं बोल. णे उरत नाहीं. पण तसे नसेल तर सरदार लोकांच्या विनंतीचा त्यांनी अम योजक कारण सांगून उपहास केला, असें ह्मटळे पाहिजे. कोणी मोठ्या पदवीचा कदी असला ह्मणजे त्याच्या पायांत रुप्याच्या बिड्या घालण्याची देशी राजांच्या दरबारांत चाल होती, असे ऐकिण्यांत आहे, त्याचाच हा एक मासला होता असें मानले पाहिजे. ही बादशाही पलटण ज्या नात्याने राणीसाहेब यांचा पहारा करीत असते, त्या नात्याने कां ती मल्हारराव महाराज यांचा पहारा करीत होती? तसे जर असेल तर मग त्या पलटणीच्या लोकांनी व अंमलदारांनी महाराज यांस लष्करी मान दिला पाहिजे होता; आणि तो तर कोठें ही देऊं नये, असा सर लुईस पेली यांनी हुकूम केला होता, यावरून त्यांचे उत्तर मोकळ्या मनाचें आणि खरें नव्हतें हैं स्पष्ट दिसतें. लार्ड नार्थ ब्रूक यांस हैं करणे पसंत पडलें कीं नाहीं, हें निश्चयानें सांगवत ना- हीं. कारण सर लुईस पेली यांच्या ह्या पत्ताचें उत्तरच ल्ब्यु बुकांत छापलेलें नाहीं. त्यांच्या सगळ्या पत्रांची उत्तरें ल्ब्यु बुकांत छापली असून, याच पताचे उत्तर ज्या पेक्षां छापलें नाहीं, तस्मात् गवरनर जनरल यांस ही गोष्ट आवडली नाहीं, आणि त्याबद्दल त्यांनी त्यांस कांहीं उपका दिला असावा असे अनुमान करण्यास जागा आहे. आपल्यास मुख्यत्वेंकरून मल्हारराव महाराज यांजवर विषप्रयोग करण्याविषयीं उत्तेजन दिल्याबद्दल आरोप आणिला होता, त्या संबंधान कोणकोणया महत्वाच्या गोष्टी घडून आल्या, त्यांच्यासाठी कोण कोणत्या देशांतील लोकांनी काय काय खटपटी केल्या, त्यांत प्रमुख कोण कोण लोक होते, त्यांच्या प्रयत्नापासून कोणते फायदे झाले, आणि महाराजांवरील दोषाचा काय परिणाम झाला, या बद्दलची ह. कीगत सांगून, त्याविषयीं गुणदोष विचार कर्तव्य आहे. गायकवाडाच्या प्रजांनी महाराजांविषयीं अमुक एक प्रकारचा प्रयत्न केला असें सांगण्यास जागा नाहीं. सर लुईस पेली यांनी प्रमुख कामदार लोकांस प्रतिबंधांत