पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. तां आपल्यास सरकारचें वाजवी देणें दिल्या वांचन सुटका नाहीं, पण मल्हारराव महाराज यांस दिले नाहीं. ( १९३) तेंच त्यांनीं सांगण्याचें तात्पर्य इतकेंच की, त्या दुर्दैवी राजावर दगड फेंकतांना कोणीही मागे पुढे पाहिले नाही. ती सर लुईस पेळी यांची कारकीर्द फार अल्प असल्यामुळे त्यांच्या योग्यतेविषयीं काही शस्त अभिप्राय देता येत नाहीं. परंतु त्यांच्या काम करण्याच्या शैलीवरून ते पराकाष्ठेचे राज्यकारस्थानी आणि हुशार कामदारांपैकी एक आहेत, असे दिसून आले आहे. पण मल्हारराव महाराज यांस प्रतिबंध केल्यानंतर त्यांच्या संबंधाने जी त्यांनीं थोडीशी असभ्य वर्तणूक केली त्यावरून व दुसन्या काही सामान्य वर्तनावरून त्यांच्यामध्ये विचार जितका मौढपणाचा असला पाहिजे हत, तितका प्रौढपणाचा नव्हता, असे दिसून येतें. एक तर त्यांनी महाराजांस डाक्तर सीवर्ड यांच्या देखरेखीखालीं ठेविलें, हें योग्य केले नाही. असे करण्यांत महाराजांचा जास्त पाणउतारा करावा या खेरीज दुसरा कांहीं उद्देश होता, असे दिसत नाहीं. डाक्तर सीवर्डखेरीज दुस- रे साहेबलोक कांहीं थोडे नव्हते. दुसरें, महाराज यांस प्रतिबंध करून डाक्तर सी- वर्ड यांच्या बंगल्यांत ज्या खोळींत नेऊन बसविलें त्या खोलीत महाराजांची एक भ व्य आणि राजचिन्हांनी व वैभवांनी युक्त अशी तसबीर भिंतीस ढांगली होती. तेथें महाराजांचा उपहास करावा या बुद्धीनें बुद्धया टांगळी होती, असे आमच्यानें ह्मणवत नाहीं; परंतु ती तेथे तशीच राहू द्यावयाची नव्हती. आपला बुद्धया उपहास करण्यासाठी ती तेथे लावली आहे, असें महाराजांच्या मनांत येऊन त्यांस आपल्या दुः खदायक स्थितीबद्दल जास्त वाईट वाटणे हें स्वाभाविक होतें. रावसाहेब बापुभाई दयाशंकर आणि गोविंदरावमामा हे महाराजांबरोबर होते त्यांनी या तसबिरीकडे पहिल्याबरोबर त्यांस रहें कोसळलें. आणि महाराजांच्या नेत्रावाटे ही अश्रुधारा चालल्या. सर लुईस पेली सारख्या धूर्त आणि हुशार मुत्सद्याच्या मनांत यापासून महाराजांस वाईट वाटेल ही गोष्ट आली नसेल, असें नाहीं. तिसरें, सरदार लो- कांस गादीचे संरक्षण करण्याची परवानगी दिली तेव्हा त्यांनी आपण गायकवाड स्थानापन्न आहों, असे जे शब्द उच्चारिले ते कोणत्याही प्रकारे त्यांच्या सभ्यपणाला उचित होते असे ह्मणवत नाहीं. महाराणी साहेबांच्या चाकराच्या चाकराने आपण गायकवाड स्थानापन्न होऊन बसणे ह्मणजे काय ? एका दिवसांत सर लुईस पेली सारखे दहा गायकवाड बनविण्याचा ज्यांचा अधिकार होता, त्या लार्ड नार्थब्रूकास देखील आपणास गायकवाड ह्मणवून घेणे शोभळे नसतें. चौथे, त्यांनी तारीख १७ जानेवारी सन १८७५ रोजी नंबर 27 चे हिंदुस्थान सरकारच्या सेक्रेटरी यांस पत्र लिहिलें होतें, त्यावरून असे दिसते की, * त्यांत बडोद्याच्या सरदार लोकांकडून

  • “ It was suggested that he should be guarded by his own Sidars instead of by

our 7th Royal Fusiliers. I informed Malhar Rao Gackwar that I deemed his life safer in the hands of British soldiers than in those of his own nobles, and I explain- ed to the Sirdars that her Majesty's 7th Royal Fusiliers enjoyed the privilege of guarding the person of Her Majesty the Queen at Windsor." (Blue Book No. 6 Page 71.) २२