पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. क्षाची होती. आणि मुख्य खजिन्यांत काय ते दोन हजार रुपये मात्र राहू दि. ले होते. सर लुईस पेली यांनी मुख्य खजिना कोणता मानिला होता, हें आह्मांस समज- त नाहीं. परंतु मल्हारराव महाराज यांस प्रतिबंध केल्यानंतर त्यांच्या खजिन्यांत काय ते दोन हजार रुपये शिलक होते, असा बोभाटा स्टेट सेक्रेटरीपर्यंत जाऊन महाराजांच्या उधळेपणाविषयीं पराकाष्ठेने टीका करण्यांत आली आहे. महाराज उ धळे नव्हते, असे आमचे ह्मणणें नाहीं, परंतु बडोद्यासारख्या धनसंपन्न राष्ट्राच्या तिजोरींत काय ते दोन हजार रुपये शिलक त्यांनी राहू दिले होते असे जें ह्मणण्यां- त आले आहे व त्याबद्दल सक्त टीका झाल्या आहेत त्या खन्या नाहीत.

सर लुईस पेली यांनी तारीख ३१ जानेवारी सन १८७५ रोज शेट साव- कार यांचे दरबार भरवून त्यांस जी हकीगत सांगितली व्यांत ते असें ह्मणाले कीं, जेव्हां मी राज्यकारभार हातांत घेतला तेव्हां काय ते दोन हजार रुपये मुख्य ख जिन्यांत होते, असे मला कळविण्यांत आलें होतें. परंतु योग्य उपाय घेतल्यावरून हल्लीं पांसष्ट लक्ष रुपयां पेक्षांजास्त रुपये खजिन्यांत आहेत आणि त्या खेरीज ज माबंदीच्या वसुलाचा प्रवाह चालला आहे तो निराळाच. तारीख १४ जानेवारी सन १८७५ रोजीं सर लुईस पेली यांनी बडोद्याच्या रा. ज्याचा अधिकार घेतला त्या दिवशीं जर सगळे काय ते दोन हजार रुपये खजि- न्यांत शिक्षक होते तर सुमारे पंधरा दिवसांत त्यांजपाशीं पासष्ट लक्षांहून जास्त रक्कम आली कोठून? चाळीस लक्ष रुपये त्यांनी मोठ्या हुषारीने हुडकून काढले असें आ- पण घटकाभर कबूल करूं, परंतु आणखी पंचवीस लक्ष रुपये तरी त्यांनी कोठून कसे जमा केले ? यावरून गायकवाडांच्या खजिन्यांत काय ते दोन हजार रुपये मात्र शिलक होते, या ह्मणण्यांत किती तथ्यपणा होता, है रपष्ट दिसून येत आहे. क्यापटन जाकसन यांनी मौला अल्ली, कुतूब खानी, मेहबूब सुभानी, आणि ह्याळसाकांत, वगैरे सरकारी दुकानांचे खजीने तपासले. त्यांत लाखो रुपये शिलक होते असे त्यांनी सर लुईस पेली यांस रिपोर्ट केल्यावरून दिसते. आतां जमाबंदीचा वसूल सर लुईस पेली यांच्या कारकीर्दीत झपाट्यानें येऊं लागला, ही गोष्ट खरी आहे. कर्नल फेर रेसिडेंट असतां गायकवाडाची मजा ज माबंदीचा पैसा मुळींच सरकारास देत नव्हती इतकी त्या प्रजेस फूस मिळाली होती. सर लुईस पेली यांनी दहा पंधरा दिवसांत तर साऱ्याबद्दल चौकशी करून काय बरें नवा बंदोबस्त केला असेल! कांहीं एक नाहीं, पण लोकांस समजले की, आ

  • “ In regard to finances at present available, Sir Lewis Pelly reminded the de

putation that when he assumed charge of the administration, he was given to un- derstand that in the Central Treasury at the capital there was something less than Rupees 2,000; that by taking measures, which to some extent, had been successful, he was happy to say that the available balance now was more than sixty-five lakhs of rupees, which was exclusive of the current revenue which was flowing in." (Baroda Blue Book No. 6 Page 25.)