पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी ( १८९ ) राग गेला किंवा नाहीं याबद्दल सर्व सरदारांस संशय आल्यावरून त्यांनी नारायण- राव यांस पुनः माफी मागण्याकरितां पाठविलें. अशी त्या बिचाऱ्या सरदाराची सर लुईस पेलांच्या एका शब्दाने धांदल उडून गेली. ( पहा ब्ल्यू बुक नं० ६ पान ८४ - १५१ ). बडोद्याच्या सरदार लोकांत फार शहाणे काय ते नारायणराव राजे पांढरे. मल्हारराव महाराज यांची त्यांनीं पुष्कळवेळां अमर्यादा केली होती. पण सरदार लोक स कर्नल फेर यांची हिमायत असल्यामुळे त्याबद्दल त्यांचे पारिपत्य करण्याचें महारा- जाचें अंगीं बळ नव्हते. सर लुईस पेली यांनी राज्यकारभार हातांत घेतल्यावर, लपवून ठेविलेले चाळीस लक्ष रुपये शोधून काढल्याबद्दल गवरनर जनरल यांजपासून शाबासकी मिळविली, त्याविषयी थोडीशी हकीगत सांगितली पाहिजे. मल्हारराव महाराज गादीवर आल्यानंतर सरकारी चार दुकानांत जो ऐवज शिळक होता तो त्यांनी सुरत आणि मुंबई येथे पाठवून तेथें व्यापार केला होता. याविषयीं आझी सर रिचर्ड मीडच्या कमिशनच्या प्रकरणांत सांगितलें आहे. मल्हारराव महाराज यांस जेव्हां असें समजलें कीं, विषप्रयोगाच्या प्रकरणांत आप- ल्यावर संकट येणार आहे तेव्हा त्यांनी मुंबईहून प्रत्येक नोट एक हजार रुपयांची अशा चार हजार नोटा मिळून चाळीस लाख रुपये मागवून आपल्या प्रत्येक राणीस वीस वीस लक्ष रुपये दिले; अशासाठीं कीं, आपल्या संकटकाळी त्यांचा उप- योग करितां यावा. हा ऐवज मुंबईच्या मुनिमांनी महाराजांच्या स्वाधीन केला तेव्हां त्याबद्दल बापुराव मोहिते सेनापती यांच्या सहीची पावती लिहून घेतली. सर लुईस पेली यांस समजलें कीं, महाराजांस प्रतिबंध करण्यापूर्वी मुंबईहून चाळीस लक्ष रु पये रवाना झाले आहेत, व त्याबद्दल त्यांनी चौकशी केल्यावरून बापुसाहेब सेना- पती यांच्या सहीची पावती त्यांस मुनीमानें दाखविली, त्यावरून त्यांनी बापुसाहेब यांस बोलावून विचारितां त्यांनी पावती कबूल केली.सर लुईस पेली त्यांस म्हणाले कीं, जर तुझी हा ऐवज एक तासाच्या आंत आमच्या स्वाधीन न कराल तर तुम्हांस वीस वर्षे पर्यंतची सक्त मजुरीची ठेप देण्यांत येईल. बापुसाहेब यांनी कबूल केलें कीं, मी रुपये तुमच्या स्वाधीन करतों आणि राजवाड्यांत जाऊन राणीसाहेब यांच्या महालां- तून ते रुपये सर लुईस पेली यांच्या कामदारांच्या स्वाधीन केले. ते आतां हा ऐवज छपावला होता ह्मणजे काय? त्यांत सेनापतीचा अपराध तो को णता आणि तो शोधून काढण्यांत सर लुईस पेली यांनी पराक्रम तो काय के छा? ते आम्हास कांहीं कळत नाहीं. मल्हारराव महाराज यांनी मुंबईहून ऐवज माग- वून आपल्या स्त्रियांच्या स्वाधीन केला होता आणि त्याबद्दल दुकानाच्या मुनिमांस सेनापतीकडून पावती लिहून देवविली होती. मुंबईच्या दुकानावर सर लुईस पेली यां नीं जप्ती केली होतीच आणि हिशेबाच्या वह्यांत जमाखर्च होताच तो पाहिला असता ह्मणजे चाळीस लक्ष रुपये बडोद्यास रवाना झाले आहेत असे त्यांस कळून