पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. करण्याविषयीं तुली आपला हक सांगावा. पण इतकें समजण्याचे सरदार लोकांम- ध्यें ज्ञान कोठें होतें! नारायणराव राजे पांढरे यांस हरिकीर्तन ऐकण्याची फार आवड आहे. ते बडोदें सरकारचे आश्रित लोकविश्रुत भन्याबाबावा दशपुत त्रिंबककर यांचें सुरस कीर्तन वारंवार ऐकत असतात. यांच्या मुखांतून ऐकलेल्या.- " निजरक्षणाधिक ध्वज रक्षणरायासि दारुका पडते " “ असतें राजशिराहुनि बहुमोलें काय दारु कापड तें" या आर्येतील भावार्थाप्रमाणे त्यांस असे वाटले असेल की राजरक्षण करण्यापेक्षां त्यांच्या गादीचे संरक्षण करण्यांत विशेष पुरुषार्थ आहे. त्यांच्या राजास त्यांच्या डोळ्यांसमोर कैद केल्यामुळे त्यांच्या पूर्वजांनी राजरक्षण करून जे यश मिळविले हो- तें तें लयास गेलें होतेंच. पण सर लुईस पेली यांनी गायकवाडाच्या गादाचें तर नाहीं पण आपल्या गादीचें संरक्षण करण्याविषयीं सरदार लोकांस परवानगी दिली, यांत देखील त्या क्षुद्र विचाराच्या सरदार लोकांनी आपण मोठा पुरुषार्थ केला असें मानिलें. पण हा नारायणराव राजे पांढरे यांचा शहाणपणाचा अभिमान देखील फार वेळपर्यंत टिकला नाहीं. तारीख २१ जानेवारी सन १८७५ रोजी सर लुईस पेली यांनी पुन्हा दरबार भरविलें त्यांत नारायणराव राज पांढरे हे कांहींस उंच स्वराने मध्येच बोजले कीं, 'तसे करण्याचा शिरस्ता नाहीं.' ही त्यांनी आपली अमर्यादा केली असे सर लुईस पेली यांस वाटून त्यांनी त्यांस सांगितले की, 'नारायणराव राजे, गायकवा- डांनी पूर्वी एक किंवा दोन आरोप तुम्हांवर आणिल आहेत त्याबद्दल नामदार गव- रनर जनरल विचार करीत आहेत. आणि आतां मला तुमच्या वर्तनाकडे लक्ष द्यावें लागेल. मी सरदार लोकांस येथे मित्रपणाच्या नात्यानें त्यांची मसलत घेण्यास बोला- विलें आहे. परंतु तसे करण्यास मी बांधला गेलो आहे असे समजू नका. मला योग्य वाटेल तसे मी करीन मग पूर्वीची रीत कशीही असो.' . हें भाषण ऐकिल्या बरोबर त्या पोकळचोळण्या सरदाराची जिव्हा सुकून गेली आणि ' दे माय धरणी ठाव', अशी दशा झाली. त्यानें सर लुईस पेली यांस हस्त जोडून विनंती केली की, मला आपण माफी करावी; आणि अशा रीतीची अमर्या- दा मी कधींही करणार नाहीं. एक वेळां माफी मागितल्यानें सर लुईस पेली यांचा

  • " A Sirdar named Narayen Raj Pandri here interrupted the speech with the

remark, made in an impertinent tone, that such a thing had never been done before. Sir Lewis Pelly. – Whether it has been done before or not, I shall do as I think right. I have called the Sirdars together in this way to consult with them in a friendly spirit, which I was by no means bound to do. But I will not be dictated to or be addressed in a disrespectful manner. I may nention that one or two charges against you, Narayen Raja Pandri, have already been brought by the Gaekwar, and have been under the consideration of the Viceroy, and if necessary, I will take your proceedings in hand. The Sirdar asked pardon, and was told that he would be pardoned, but that a similar disrespect should never happen again." (Baroda Blue Book No. 6 page 84.)