पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- आलें असतें; आणि सेनापतीस विचारल्या बरोबर त्यांनी जसे कबूल केलें तसें महा- राजांनीं व त्यांच्या राण्यांनी देखील कबूल केले असतं कीं ऐवज आम्हांजवळ आहे. त्या ऐवजाचा अगदींच ठिकाणा पडूं नये असें तें कोणते कार- स्थान आणि लबाडी झाली होती, की त्याबद्दल सर जुईस पेली यांनी रुपये शोधून काढल्याबद्दल इतका स्तोम मिरवावा, एक तासांत रुपये हवाली न केले तर वीस वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा देईन अशी सेनापतीस धमकी द्यावी, याबद्दल सर लुईस पेली यांस ज्यांना बातमी दिली त्यांनी एक मोठी नौकरी बजाविली असें मानावें, आणि गव्हरनर जनरल यांनी त्याबद्दल सर लुईस पेली यास शाबासकी द्यावी! महाराजांची अशी समजूत होती की हा ऐवज माझा खाजगी आहे, आणि झणून त्यांनी तो आपल्या राण्यांच्या स्वाधीन केला होता. त्यांत लबाडी लाताडी ती कोणती होती ? सर लुईस पेली यांनी चार्ज घेतल्याबरोबर त्यांच्या स्वाधीन सेनापतींनीं ऐवज केला नाहीं हा त्यांचा दोष काय ? महाराजांनी राणीसाहेब यां- च्या स्वाधीन रुपये केले होते ते सर लुईस पेली यांच्या स्वाधीन करण्याचे बापूसाहेब यांस प्रयोजन काय ? व तो ऐवज त्यांच्या स्वाधीन करण्याचा त्यांस अधिकार का- य ? ऐवज राणीसाहेब यांजपाशीं होता आणि त्यांहीं तो सेनापती यांचे स्वाधीन के ला नसता तर त्याबद्दल सेनापती यास धमकी दिल्याप्रमाणे वीस वर्षांचे तर काय पण एक दिवसाची तरी कैद सर लुईस पेली यांच्या नें न्यायानें देवविली असती का- य ? मल्हारराव महाराज यांचे अनुकरण यांनी केले असते तर मात्र त्यांस पाहिजे ते करण्याची मोकळीक होती, कारण ते त्यांच्या स्थानापन्न झाले होते. 7 सर लुईस पेली यांनी या आरोपावरून सेनापती यांस बरतर्फ केलें; त्यांस मल्हा- रराव यांचा मेहुणा एवढ्या मोठ्या हुद्यावर नको होता. हे कृत्य करतांना त्यांनीं सरदार लोकांची अनुमती घेतली, आणि ती त्यांनी मोठ्या संतोषाने दिली. त्य.स से. नापती खातें नको होते. खंडेराव महाराज यांनीं भाऊ शिंदे यांस सेनापती केले तेव्हांच त्यांनी पुष्कळ हरकती घेतल्या होत्या आणि त्यावेळेस कर्नल फेर रे- सिडेंट असते तर या संबंधानें महाराजांच्या आणि सरदारांच्या मध्यें बरेंच भांडण लागले असतें. सरदार लोकांस असे वाटले की हा अधिकार शिलेदार आणि शिबं दी बक्षी यांजकडेस आला म्हणजे आपल्यास फार सोईकर होईल, पण भावी परि- •णाम त्यांच्या लक्षांत आला नाहीं, व याहून एक जबरदस्त खाते आपल्या उरावर बसणार आहे हे समजलें नाहीं. सर लुईस पेली यांनी बडोद्याचा राज्यकारभार कसा चालविला याविषयीं तप शीलवार सांगत बसण्यांत काही अर्थ नाहीं. ते मल्हारराव महाराज यांच्या स्थाना पन्न होते व जितकें शक्य असेल तितकें करून जुन्या रितीभातीप्रमाणे बडोद्याचा राज्यकारभार चालविण्याविषयीं त्यांस गवरनर जनरल यांनीं पूर्ण अधिकार दिला होता. यामुळे जुन्या कामदार लोकांस अपराधावांचन धरून कैदेत ठेवणें, आणि गुन्ह्यावांचून मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीतील मंडळी स