पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी ( १८७ ) त्या चौकशीत जें जें निष्पन्न होईल त्याच्या विचारांती जसें ठरेल त्याप्रमाणे देशी. राज्याची पुनः स्थापना करण्यांत येईल." व्हाइसराय व गवरनर जनरल आफ इंडिया इन् कौन्सिल यांचे हुकमावरून- सी० पू० एचीसन. फारिन सेक्रेटरी .. महाराजांस प्रतिबंध केल्यानंतर पायदळ आणि घोडेस्वार यांचें लष्कर शहरांत पा- ठवून बंदोबस्त करण्यांत आला होता, व जामदारखान्यास मोहरा केल्या होत्या. त्याच दिवशी दोन प्रहरानंतर सरदार, शिलेदार, दरकदार, पागेदार, पारख, गायकवाडांचे संबंधी, जमीदार, आणि शेतकरी लोकांपैकी काही प्रमुख लोक, आणि गायकवाडांच्या प्रजेचा मोठा समुदाय असे रेसिडेंसीच्या बंगल्याजवळ जमा केले होते. मुख्य मुख्य सरदार आणि दुसऱ्या वर्गातील प्रमुख लोकांस दरबारांत बोलावून त्यांस जाहीरनामा वाचून दाखविला. आणि त्याच्या शेवटीं पुन्हा देशी राज्याची स्थापना करण्यांत येईल याविषयीं जें कलम लिहिले होतें, त्याजकडे त्यांचें लक्ष ला.. वून सर लुईस पेली ह्मणाले कीं, हें राज्य ब्रिटिश सरकारच्या राज्यांस जोडून दे- ण्याचा सरकारचा तिळमात्र देखील इरादा नाहीं. सरदार लोकांनीं सर लुईस पेली यांस अशी विनंती केली कीं, राजांच्या गैरहज रींत पांढरे आणि नबाबसाहेब यांनीं गादीचें, आणि डोसमहमद जमादार यांनीं जामदारखान्याचें संरक्षण करावें, असा रिवाज चालत आलेला आहे. यासाठीं तो त्यांचा हक्क अंमलात आणण्याविषयीं त्यांस परवानगी द्यावी. या सरदार लोकांच्या. विनंतीबद्दल कांहीं वाटाघाट होऊन, शेवटीं सर लुईस पेली यांनी, सरदार लोकांनी गादीचे संरक्षण करण्याचा आपला हक्क अंमलात आणावा, अशी त्यांस परवानगी दिली.

  • सरदारलोकांस गादीचें संरक्षण करण्याविषयीं सर लुईस पेली यांनी परवान

गी दिली तेव्हां त्यांस ते ह्मणाले की, गायकवाड शहरांत नसले म्हणजे मुख्य सर दारांपैकी दोघांनी गादीचें संरक्षण करावें, अशी वाहवाट चालत आली आहे, आ- णि हल्लीं गायकवाड स्थानापन्न मी असून मी शहराच्या बाहेर राहत आहे, यास्तव: दोन सरदारांनी गादीचे संरक्षण करावें असा मी हुकूम देईन. या भाषणांत किती दर्प आहे आणि सरदार लोकांच्या विनंतीचा कसा उपहास केला आहे हें स्पष्टच आहे. सर लुईस पेली यांनी गर्भित अर्थाने असें देखील सूचित केलें कीं तुमचा राजाच कोठें राजपदावर आहे तर त्याच्या गादीचें रक्षण

  • “ As to the protection of the guddee, I find that it has been usual, when the

Gaekwar was absent from the town, for the two principal Sirdars to guard the guddee- so, as I am in the position of the Gaekwar and reside without the town, I shall issue orders to two principal Sirdars guard the guddee." ( Blue Book No. 6 Page 84.)