पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. माझी बेअदबी केळी, असें निमित्त आणून त्याजकडून माफी मागविली होती. त्यांस सर लुईस पेली यांनी महाराजांचे मित्र मानिलें होतें. ठीकच आहे ! सीवर्ड साहेब हे कर्नल फेर यांचे परम मित्र आणि महाराज आणि कर्नल फेर हे परस्परां- चे परम मित्र, तेव्हां सीवर्ड साहेब यांस महाराजांचे मित्र मानणे उचितच होतें. जाहिरनामा प्रसिद्ध केला तो असाः-- “ सर्व लोकास या जाहिरनाम्यानें जाहीर करण्यांत येतें कीं, मल्हारराव गायक. वाड यांचे दरबारी सरकारानें नेमलेले माजी रोसडेंट कर्नल फेर सी० बी० यांस विष घालून मारण्याचा प्रयत्न केला गेला, व कर्नल फेर यांस वर लिहिलेला विषप्र- योग करण्याचे प्रयत्नास मल्हारराव महाराज यांनीं फूस दिली असा पुरावा दाख- विण्यांत आला आहे. व अशी विषप्रयोग करण्यास फूस देणे ह्मणजे मलिकामा अ झमा महाराणी यांचे विरुद्ध महत् अपराध करणे होईल; आणि ज्या शर्तीवर मल्हा- •रराव गायकवाड यांस बडोदें संस्थानचे राजे ह्मणून सरकारानें मान्य केले आहे त्या शर्ती मोडणें होईल; व शिवाय असा विषप्रयोगाचा प्रयत्न करणे ह्मणजे इंग्रज सर- कारांशी वैरभावानें वागणे होईल; व मल्हारराव महाराज यांजवर आलेल्या अघोर- संशयाच्या खरेपणाविषयीं उघड रीतीनें व पूर्णपणे चौकशी करणें जरूर आहे व म- ल्हारराव महाराज यांस त्यांजवर आलेल्या अघोर संशयांतून मुक्त होण्यास हरएक संधी देणे जरूर आहे व ह्या कारणासाठी मल्हारराव यांस राज्याविकारापासून तूर्त दूर केले पाहिजे व बडोदें संस्थानांत राजकारभाराचा दुसऱ्या रीतीने बंदोबस्त कर णे भाग आहे. ह्मणून या जाहिरनाम्याने जाहीर करण्यांत येतें कीं, आज तारखेपासू न व्हाइसराय व गवरनर जनरल आफ इंडिया इन् कौन्सिल यांनीं तूर्त बडोदें सं- स्थानचा अधिकार आपले हाती घेतला आहे, व राज्यकारभार करण्याचे सर्व अ. धिकार त्यांनी बडोदें येथील एजंट आणि स्पेशल कमिशनर यांस दिले आहेत. ब. डोदें येथील राज्यकारभार होईल तितकें करून तेथील चाली, रीति व कायदे ह्यां. च्या अनुरोधानें चालविला जाईल. सर्व इनामदार, सरदार, जमीनदार व बडोदें संस्थानांत राहणारे लोक व बडोदें संस्थानांतील लष्करी व दिवाणी खात्यांत नौकरी करणारे व ज्या वेळेस जरूर लागेल त्या वेळेस संस्थानची नौकरी करणे ज्या लोकांस भाग आहे असे सर्व हुद्देदार व दुसरे लोक या सर्वांस या जाहिरनाम्यानें हुकूम करण्यांत येतो कीं, त्यांनीं गवरनर जनरलचे एजंट व स्पेशल कमिशनर यांचा अधिकार, जो काळपर्यंत संस्थान ब्रिटिशसरकारचे हातीं राहील, तोपर्यंत मान्य केला पाहिजे, व त्यांचे हुकूम पाळले पाहिजेत. हिंदुस्थानांतील राजे रजवाडे यांची संस्थानें चालवून तीं त्यांच्या वंशजांकडे ठेवून त्यांच्या घराण्याचा मानमरातब राखूं ह्मणून जें मलिकामा अझमा महाराणी यानीं कृपाळू होऊन कळविले आहे, त्या अन्वयें महाराजांची चौकशी पुरी झाल्यावर व