पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी ( १८५ ) जांनी संतोषानें कबूल केला असे सर लुईस पेली यांचें नित्यवृत्त रावबहादूर मणी- भाई यांनी लिहिले आहे, त्यांत लिहिले आहे. आह्मी महाराजांचें आणि सर लुईस पेली यांचे भाषण वर लिहिले आहे, तें देखील त्या रोजनिशीवरूनच लिहिले आहे. सिवर्ड साहेब यांचा बंगला महाराजांस राहण्यास योग्य स्थळ होतें, याविषयीं सद रोजनिशींत असे कारण लिहिले आहे कीं, तो बंगला रेसिडेन्सीच्या जवळ अस ल्याने महाराजांवर असंतुष्ट झालेल्या महाराजांच्या प्रजेपासून त्यांस कांहीं उपद्रव होण्याचा संभव नाहीं. आह्मास येथें इतकेच सांगितले पाहिजे कीं, महाराजांच्या प्रजेवर हा राजद्रोहाचा वहीम घेतला त्यास कांहीं देखील योग्य प्रमाण नव्हते. आझी मागे लिहिलेच आहे कीं, मुंबईसरकारांनी कर्नल फेर यांच्या द्वाराने राजरोस रोतीने महाराजांस कळवि- लेंच होतें कीं, तुझी जर अन्यायाने राज्यकारभार चालवाल तर तुमचें जीवित, अनु, आणि राजपद संरक्षण करण्याचा इंग्रजसरकारांनी पतकर घेतला आहे, असे तुझी समजूं नये. मल्हारराव महाराज यांच्या प्रजेस ही एक प्रकारची चेतवणूक दिल्या सारखें झालें होते, असे झटले तरी चालेल. कारण महाराजांच्या प्रजेची राजभक्ति जरी कमी झाली नव्हता तरी त्यांत त्यांचे शत्रू पुष्कळ होते. आणि कर्नल फेर यांचें महाराजांस पराकाष्ठेचें प्रातिकुल्य असल्यामुळे अशा प्रकारच्या उघड सूचनेचा परिणाम कदाचित् भयंकर झाला असता असे भय बाळगण्यास कारण होतें. परतु त्यावेळेस देखील तसे काहीं अविचाराचे कृत्य कोणी केल नाहीं. तें आतां महारा- जांस परम दुःखदायक संकटावस्था प्राप्त झाल्यावर त्यांच्या प्रजेपैकी कोणी करील अशी शंका घेणें वृथैव होय. हिंदुस्थान सरकारांनी तर असा हुकूम फर्माविला होता कीं, *तुली महाराजांस त्यांच्या राजवाड्यांपैकी एका वाड्यात प्रतिबंधांत ठेवावें. आ- णि तशी सोयीवार जागा नसेल तर जी जागा तुह्मांस उचित वाटेल त्यांत म हाराजांस ठेवावें. इंडिया सरकारचा मुख्य हेतू झटला ह्मणजे, महाराजांच्या राजवा- ड्यांपैकी एका वाड्यांत महाराजांस प्रतिबंधांत ठेवावें, असा होता, व तशी सवड न. सेल तर मात्र सर लुईस पेली यांस उचित वाटेल त्या जाग्यांत त्यांनी महाराजांस ठे- वावें असा त्यांस अधिकार दिला होता. महाराजांस स्वतंत्रपणें बंदोबस्तानें ठेवितां येईल, असे बंगले शहरच्या बाहर होते. आणि गवरनर जनरलच्या मु य हेतूला अनुसरून सर लुईस पेली यांनी एखादा बागांतील बंगला महार- जांस राहण्यासाठी पसंत केला असता तर महाराजांस आणि त्यांच्या मंजस उगीच कांहींसें बरे वाटलें असतें. त्यांत डाक्टर सीवर्ड साहेब यांच्या बंगल्यांत महाराजांस ठेऊन त्यांजवर त्यांचें निरीक्षण ठेवणें ही गोष्ट तर सर्वथैव उचित नव्हती. कारण सीवर्ड साहेब यांनी महाराजांच्या स्वारानें

  • “ I have already telegraphed to you to take steps for the arrest of Mulhar

Rao Gaekwar and his honourable confinement in one of his palaces, or, if that be thought an unsuitable place, in such other suitable building as you may consider most convenient.” ( Baroda Blue Book No. 6 Page 62.) २१