पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८४ ) महारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. यांनीं महाराजांस स्मरण दिलें कीं, दोन अथवा तीन महिन्यांपूर्वी कर्नल फेर यांस विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला, त्यांत महाराजांचा संबंध आहे, असे पुराव्या- वरून निष्पन्न होतें. असं महाराजांस मी याच जागेत काही दिवसांपूर्वी सुचविलें होते, त्याबद्दलचे सर्व कागदपत्र हिंदुस्थानसरकाराकडेस जाऊन त्यांजवर त्यांचा जो हुकूम झाला. तो मला महाराजांस कळववायाचा आहे. महाराजांही मध्येच बोलून सर लुईस पेली यांचें भाषण थांबविलें. ते ह्मणाले की, गोविंदराव बोवांच्या वंशजापासून अशा प्रकारचें वाईट कृत्य व्हावयाचें नाहीं. आणि दोन्ही सरकारांमध्ये एकरंगी दोस्ती जडली आहे, ती लक्षांत घेऊन मी ब्रिटिश सरकारच्या इच्छेस आधीन आहे. परंतु माझ्यावर जो आरोप आणिला आहे तो शत्रुभावाचा परिणाम आहे; माझी अपयें देखील मला अनुकूल नाहींत, आणि मल इतके पुष्कळ शत्रू आहेत की, मी ज्या जागवर बसलो आहे, तीच मला गडप करील की काय असे मला वाटते; आणि मी ही गोष्ट आरंभींच आपणास सां- गितली होती; आणि मी वारंवार चोलून दाखविले आहे की, माझा विश्वास आपल्यावर आहे यासाठी गवरनर जनरल या हुकूमाप्रमाणे आपणच याबद्दलची चौकशी करावी. नंतर सर लुईस पेली यांनी पुन्हा भाषणास सुरुवात केली. ते ह्मणाले कीं, त्रि- षप्रयोगाच्या मुकदम्याबद्दल उघडरीतीने चौकशी करण्याविषयीं हिंदुस्थान सरकारांनों हुकूम फर्माविला आहे. आणि चौकशी चालली असता न्यायाला अनुलक्षून जित- के साह्य महाराजांस देणे योग्य असेल तितकें देण्यात येईल. अ.णि महाराजांस दो- षमुक्त होण्यासाठी बारिस्टर लोकांची मदत घेतां येईल. राज्यकारभारातील अव्य- वत्थेचा संबधानें महाराज संकटांत आल असते तर मी महाराजांस सला मसलत सांगून त्यांतून पार पाडलें असतें. परंतु या कामांत माझा काही संबंध राहील अ से वाटत नाही, याबद्दल चौकशी करण्यासाठी दुसरे मोया हुद्याचे अधिकारी ने मण्यांत येतील, असे मला वाटतें. आ यानतर नेटिव्ह असिस्टंट यांजकडून इंडिया सरकाराकडून आलेल्या जाहिरना- म्याचे भाषांतर महाराजांस वाचून दाखविलें. महाराजांस प्रतिबंध कोठें करावा, याविषयीं भानगड झाली. सर लुईस पेली यांचें ह्मणणें अस पडलें का, पहाराज माझ्या भेटी साठी आले आहेत यास्तव ब्रिटिश सरकारच्या झेंड्या खाली मी त्यां स प्रतिबंध करू शकत नाहीं. महाराज ह्मणाले की, मी होऊन तुझाकडेस लो आहे, तर मला येगेंच कैद करा. मी राजवाड्यांत जावें, आणि तेथून तुझी मला कैद करून आणावे, अशी माझी बेअब्रू करण्यांत काय अर्थ आहे? पण सर लुइस पेली झणालें कीं, माझ्याच्यानें तसे करवत नाहीं. शेवटी कापाच्या शहराच्या हद्दींपर्यंत महाराजानीं गाडीत बसन जावें, आणि तेथें त्य.स कैद करावें, अशी तोड निघाली. आणि त्याचप्रमाणे महाराज यांची गाडी शहरच्या हद्दीत. आल्यावर महाराज यांस कैद केले. आणि महाराजांस रहाण्यासाठी डाक्टर सीवर्ड यांचा बंगला पसंत केला. तो महारा