पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी ( १८३ ) कारभार मोठ्या शहाणपणानें चालविला; आणि 'ज्येष्ट भ्राता पितुः समः, ह्या महद्वा- क्याविषयों परमादर दाखविला; गोविंदराव गायकवाड यांनी पेशव्यांस अनावर झालेला आब शेळुकर याची मस्ती जिरवून त्यापासून अमदाबाद शहर हितकून घेतळे, आणि गुजराथेंतील आपले राज्य निष्कंटक केलें; सयाजीराव महाराज यांनी केवळ आपल्या आश्रितांचा अभिमान घरिल्यामुळे रेसिडेंटाच्या अवकृपेंपासून त्यां स अनेक प्रकारची दुःखें सोसावी लागली असता त्या महामनस्क राजाने त्यांची कांहीं एक परवां न करितां 'अंगीकृतं सुकृतिनः परिपालयन्ति' हे वाक्य यथार्थ क रून दाखविलें, आणि आपल्या आश्रिताच व प्रजेचे आपण परम ममताळू जनक झणवून घेतलें; त्यांचे चिरंजीव खंडेराव सहाराज यानी सन १८५७ घ्या सालत बंडाच्या प्रसंगी इंग्रजसरकारांस मनःपूर्वक सहाय करून त्यांच्या उपकारांची सव्याज फंड केली, आणि दत्तकाबदल सनद मिळवून अपिल्या घराण्याचे राज्यपद चिरस्थायी केले याप्रमाणे गायकवाड यांच्या घराण्यांतील विख्यात पुरुषाही शौर्य, धैर्य, पराक्रम, सत्यवृत्तता, दृढनिश्चय, प्रामाणिकपणा, आश्रिताविषयीं अभिनान, आ- णि अव्यभिचारिणी मैत्री, येणेकरून आपले घराणे लोकविश्रुत केले. त्या घराण्या- ची कीर्ति, अब्रु, योग्यता, सत्ता, आणि ऐश्वर्य आपल्याबरोबर अस्ताचलास नेण्या- करिता त्या दिवशींचा सूर्य उदयाचलावर उदित झालेला पाहून त्याबद्दल ज्यांचें अं- तःकरण पापडाप्रमाणे भाजलें नाहीं, असा मानवी प्राणी काहां दुष्टोक खेरीज करून या गायकवाडांच्या राष्ट्रांत कोणीही नव्हता- महाराज यांनीं उभयतां राणीसाहेब यांस भेटून व आपल्या मुलाचें मुखावलोकन करून त्या दिवशीं प्रातःकाळी आठ- वाजण्यापूर्वी राजवाडा सोडला. हा आपला आपल्या राजधानीशीं निरंतरचा वियोग आहे, असे त्यास वाटलें. आणि लोकांचें अनुमानही तसेच होतें. महाराज कापांत गेल्याबरोबर त्यांस आगगाडींत घालून सातारच्या महाराजांप्रमाणे कोणत्या तरी एका क्षेत्रों नेऊन त्यस क्षेत्रसंन्यास देतील असे वाटले होते. परंतु तें अनु. मान खोटें झालें. आणि हिंदुस्थानसरकारांनी महाराजांवरील दोषाबद्दल चौकशी कर रण्याचा एक नवाच नमूना शोधून काढिला. सर लुईस पेली यांनी सांप्रदायाप्रमाणे महाराजांची मुलाकत घेतली. या दरबा रांत बडोद्याचे कम्यांडिंग आफिसर असिस्टंट रेसिडेंट रिचीसाहेब, आणि क्यापटन डॉकसनसाहेब आणि दुसरे कामदार हजर होते, त्यांच्या समक्ष महाराज यांस सर लुईस पेली यांनी असे सांगितले की मी येथे आल्यापासून या वेळपर्यंत महाराजानी माझ्या बरोबर जे दळण वळण ठेविलें, तें फार समाधानास्पद होतें; आणि माझ्या मसलती प्रमाणें आणि सूचने प्रमाणे राज्यकारभारांत सुधारणूक करण्याची महा- राजांची फार इच्छा होती; आणि महाराजांविषयीं मो एक देखील गान्हाणे सांगावें अ शी काही गोष्ट घडून आली नाहीं; आणि याबद्दल मी व्हाइसराय सहन यांस आणि माझ्या मित्रांस कळविलें होतें; परंतु आतां अतिशय दुःखदायक गोष्ट करण्याची माझे कपाळी आली आहे, आणि ती मला केली पाहिज. नंतर सर लुईस वेळी