पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. शेवटचें तीळ घेतलें, आणि मोठ्या प्रेमानें आपल्या कृपेंतील मंडळीस आपण जातीने दिलें. दरबार खलास झाल्यावर अस्तमानीं रावसाहेब बापूभाई दयाशंकर व गोविंदराव मामा यांस महाराजांनीं सर लुईस पेली यांजकडेस पाठवून त्यांस विचारविले कीं, माझी आतां भेट होईल का ? त्याचें उत्तर त्यांनी असे सांगून पाठविलें कीं, गवरनर जनरल यांजकडून तारायंत्रद्वारें मला हुकूम येत आहेत, त्यासाठी मी तारायंत्र आफि सांत गुतलों आहें, सबब या वेळेस माझी भेट होणे शक्य नाहीं. महाराजांनी उ दईक प्रातःकाळी आठ वाजता रेसिडेंसीत यावें. त्या रात्रीं महाराजांनी आपले जुने कामदार यांस बोलावून त्यांची शेवटची भेट घेतली, आणि प्रतिनिधी खानवेलकर आणि सेनापती मोहित वगैरे मंडळीस सक्त ताकीद केली कीं, इंग्रजसरकारच्या मनांत तिळमात देखील असे येता कामा नये कीं, त्यांजबरोबर माझ्या घराण्याचा जो अकृतीम स्नेह जडला आहे, आणि त्यांच्या पवित्र न्यायाबद्दल जो माझा पूर्ण विश्वास आहे, त्यापासून मी किचित् देखाल परा- ङ्मुख झाला आहे. मजवर आजपर्यंत जे अन्यायाचे जुलूम झाले ते मी सोसले. आणि यापुढे ही जे जुलूम होतील ते मी सोशीन. परंतु माझ्या साठी या राष्ट्राला धक्का लागेल असे कोणी कांहीं एक कृत्य करूं नये, याप्रमाणे सर्वांस ताकीद करून नित्य नियमाप्रमाणे तमाशा आटपल्यावर महाराज निजावयास गेले. तारीख १४ जानेवारी सन १८७५ चा दिवस खरोखर फार भयंकर वाटू ला- गला. गायकवाडाच्या घराण्यांतील मूळ पुरुष दमाजीराव गायकवाड यांनी खडेराव दाभाडे यांच्या फौजत बहादुरी करून जे यश मिळविलें, पिलाजीराव गायक- वाड यांनी आपल्या शौर्याने सन १७३१ मध्ये सेना खासखेल ही पदवी संपादन करून व आपलें घराणे राज्यपदीं स्थापित करण्याच्या योग्यतेस आणवून जे महव संपादन केले, दामाजीराव महाराज यांनी साताऱ्याच्या राजानें आपल्या उजव्या हातावर वचन देऊन तें पाळिलें नाहीं, यामुळे तो हात आतां रामराम करण्यास पात राहिला नाहीं, असें मानून त्या हाताने कधींही रामराम केला नाहीं, आणि तसे करून सातारच्या राजाच्या बेइमानीपणाबद्दल जगापुढे स्पष्टपणें तिरस्कार केला, व आपल्या बापास मारकरी यांजकडून मारवाडचा घातकी राजा अनेसिंग यानें मारावेळें त्या बदलचा सूड उगविण्याकरितां जोधपूरच्या दर वाज्यापर्यंत लुटफाट करून अभेसिंग यांस अमदाबादची सुभेदारी सोडून देणें भाग पाडिलें, आणि बडोदें शहरही आपल्या राज्याची राजधानी करून तैमुरलंग याच्या घराण्यांतील दिल्लीच्या बादशहांचे गुजराथेंवरील स्वामित्व लयास नेऊन ता, शत्रुदंडनाविषयीं ततरता, आणि शौयशालीनता या लोकोत्तर आपले राजघराणे लोक वंद्य केले. दामाजीराव महाराज यांचे कनिष्ठ चिरंजीव फ त्तेसिंग राव महाराज यांनी इंग्रज सरकाराबरोबर स्नेह संबंध जोडून पेशव्यांच्या का रस्थापाना सून आपले ज्येष्ट बंधू सयाजीराव महाराज यांचे राज्य बचादून याचा, सत्यप्रिय- गुणे करून