पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- कर्नल फेर यांस प्रयोग केल्याबद्दलची चौकशी. ( १८१) डांकडेस आहे, असे माझे म्हगणे नाहीं. माझा अभिप्राय तर उलट असा आहे की, महाराजांनी सुधारणक करण्याचें मनात आणिले असेल, परंतु त्यांचे विचार त्यांच्या होता खालच्या लोकांनी अमलांत येऊ दिले नसतील. आणखी ही गोष्ट उघड आहे फौं, सांप्रतचा वाईट स्थिती फार काळापासून चालत आलेली अहे; मल्हारराव महाराज यांच्याच कारकिर्दीचा तो परिणाम नाहीं. बडोद्याच्या दरबाराबरो- बर संबंध ठेविण्यांत आपण देखील काही चुका केल्या असतील; आणि माझा अ सा भरंवसा आहे कीं, सांप्रतकाळी महाराज आपल्या उपदेश प्रमाणे चालण्यास आणि आपल्या राज्यांत सुधारणूक करण्यास मनापासून उत्सुक आहेत. तथापि शांतपणानें विषप्रयोगाची सर्व गोष्ट लक्षात घेऊन हा मोकदमा विचारात घेता माझा असा अभिप्राय झाला आहे कीं, मल्हारराव महाराज यांस पदच्युत करून राज्याचें संरक्ष- ण करावें, आणि सानुकूल अशा शर्तीने एक लहान मुलगा गादीवर बसवावा, अथवा दुसरी कांहीं व्यवस्था करावी. याप्रमाणे सरलुईस पेली यांच्या रिपोटीतील एकंदर तात्पर्य आहे. हिंदुस्थान सरकारांनीं मर लुईस पीचा रिपोर्ट वाचल्यावर व त्यांस जें कांहीं कागदपत्र पहाण जरूर वाटले ते पाहिल्यावर आणि सुटर साहेब यांस समक्ष बोला- वून त्यांनी कोणत्या प्रकारें प्रारंभीची चौकशी केली यांजबद्दल पुसतपास केल्यावर व सरकारी बारिस्टराचें मत घेतल्यावर, त्यांच्या मनांत असे भरलें कीं, विषप्रयोग करण्यांत मल्हारराव महाराज य चें अंग आहे असा संशय घेण्यास योग्य प्रमाणे आहेत. यासाठी याबद्दलची पुरी चौकशी झाली पाहिजे, सबब त्यांनी सरलुईस, पेली यांस मल्हारराव महाराज यांस प्रतिबंधांत ठेऊन राज्यकारभार त्यांनी आपल्या हातांत घेण्याविषयीं तारीख १३ जानेवारी सन १८७५ रोजी जाहिरनाम्यासहित तारायंत्रांतून हुकूम पाठविला. तारीख १२च्या रात्रीं तोफखाना, गोरेलोकांच्या पल्टणीचा कांहीं भाग, आणि एक काळी पलटण यांनी भरलेल्या आगगाडींच्या हरी एकामागून एक मुंबईहून बडोद्यास आल्या. त्यावरून मल्हारराव महाराज यांचें राज्य उपास जाण्याचा वेळ अगदीं समीप आला आहे, असे तारीख १३ रोजीं सर्वांस सहजच कळून आले. ह्या दिवशीं संक्रांत होती. सांप्रदायाप्रमाणे तिळगूळ देण्याकरितां मल्हारराव महा- राज यांचे दरबारास सरदार व मानकरी मंडळापैकी कोणी आले नव्हते. दरकदार मंडळी, नानासाहेब खानवेलकर, बापूसाहेब मोहिते, हरीबा गायकवाड, रावबहादूर मुकुदराय मणीराय, आणि जगज्जीवनदास खुशालदास, आणि जुने कामदार लोकां- पैकी काही मंडळी इतकेच कायते या दरबारांत हजर होते. महाराजांचे हें शेवटचें दरबार आहे असे त्यांच्या उदासीन दखाव्यावरून दिसून आलें. महाराजांची मुख- श्री अगदीं ग्लान झाली होती, आणि इतर मंडळींच्या मुद्रा अगदी उदासीन दिस- त होत्या. कंठ सद्गदीत झाल्यामुळे गाणारणीचें मंजूळ आणि सुस्वर गायन अ- गदर्दी उदास भासं लागळें होनें. अशा ह्या उदासीन दरबारांत महाराजांनी सर्वांचें