पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. (१७९) महाराजांची इच्छा आहे, असे त्या रिपोटीत लिहिले आहे, आणि अशा प्रकार- रच्या कामासाठी यशवंतराव येवल्या हा योग्य साधन अ.हे व त्याच्या द्वारें जादू आणि अनुष्टानें कर्नल फेर य.जवर करविलीं, असेही गजानन विठ्ठल यांनी क ळविले आहे. कर्नल फेर यांस विषमयोग करण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यापूर्वी माझें मुख्य डिटेक्टिव्ह आफिसर खान बहादुर मीर अकबर अल्ली, आणि मीर अबदुल अल्ली यांनी मला असे कळविले होते की, कर्नल फेर यांजपासून सुटका करून घेण्यासा ठी गायकवाडांच्या विश्वासक एजंटांनी मुंबई मध्ये एखादा बिलंद जादूगार मिळ- विण्याचा प्रयत्न केला होता; व मी त्याबद्दल मुंबई सरकारांस रिपोर्ट केला होता. मीं बीस वर्षे पर्यंत पोलिसचें काम केलें आहे; त्या अनुभवावरून मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो कीं, कर्नल फेर यांचा प्राणघात करण्यासाठी विषप्रयोग करण्याविषयी म ल्हारराव महाराज यांनी स्वतः उत्तेजन दिलें आहे. आणि याविषयीं मला तिळमात देखील संशय नाहीं. आपल्या हुकुमाप्रमाणे पुराव्याचे कागद आडव्होकेट जनरल यांजकडे तारीख ३० डिसेंबर रोजी पाठविले होते; आणि त्यांनीं जो अभिप्राय दिला तो या रिपोर्ट - स जोडला आहे. आणि मला जें काम बजाविण्यास आपण फर्माविलें होतें तें सां- प्रतच्या स्थितीत जितकी आशा करावी तितक्या परिमाणाने उत्तम रीतीनें शेवटास गेले आहे, असें मी समजतों. सदई प्रमाणें मुंबईचे पोलिस कमिशनर सर सूटर यांनी सर लुइस पेळी यांस पत्र लिहिले, त्यांतील तात्पर्य आहे. सर लुईस पेली यांनी तारीख ७ जानेवारी सन १८७५ रोजी हिंदुस्थान सर- रकारांस रिपोर्ट केला. त्यांत त्यांनीं विषप्रयोग करविल्याचा दोष मल्हारराव महाराज- यांजवर लागू होतो, असा अभिप्राय दिला. सद्हू रिपोटर्यंत त्यांचें ह्मणणें असें आहे की, मल्हारराव महाराज यांचे पूर्वीचें आचरण पहाता अशा प्रकारचा आरोप त्यां जवर तिसऱ्याने आला आहे. खंडेराव महाराज यांस विषप्रयोग करण्याचा त्यांनीं प्रयत्न केला होता. भाऊ शिंदे यांस विष देऊन मारल्याचा त्यांजवर संशय आहे. च; लोकवार्ता अशी आहे की, या खरोज त्यांनी आणखी दुसरी अघोर कर्मे केली आहेत. परंतु जोपर्यंत ते अधिकारावर आहेत तोपर्यंत त्याबद्दल पुरावा मिळू शक णार नाहीं. रेसिडेंटसीच्या दप्तरावरून आणि दुसऱ्या प्रमाणांवरून असे दिसते कीं, वर्ष दीड वर्षांपासून राजकीय कामांच्या संबंधाने रेसिडेंट आणि मल्हारराव महाराज यांचे दरम्यान नेहमीं वैरानी धुमसत होता. बडोद्याच्या राज्यकारभारांत बारीक सारीक गोष्टींत देखील वारंवार रेसिडेंट हात घालीत होते, ही गोष्ट राजास फार त्रासदायक वाटत असे. विषप्रयोग करण्याचा विचार मल्हारराव महाराज यांचे म नांत एकाएकी आला असें नाहीं. पहियानें त्यांनीं रेसिडेंट यांचें शांतवन करण्या. चा, त्यांस कितावेण्याचा, त्यांजवर जादू करण्याचा, आणि त्यांस घालवून देण्याचा