पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. तले की, मी त्या पत्याच्या शेवटीं एक गुप्त पाकीट आहे त्यांत ठेवीत असे; तेव्हां त्यास विचारलें कीं तो पट्टा कोठे आहे ? तेव्हा त्याने सांगितलें कीं, बुधरनरसूपटेवाला याजजवळ आहे; बुधर यांस तकाळ बोलाविले, आणि जो पट्टा रावजी घालीत होता तोच हा आहे असे सांगितल्या- वरून व्याजपासून तो पट्टा घेतला, आणि मोठ्या सावधगिरीने पाकीट तपासता त्यांत एक कागदाची पुडी दृष्टीस पडली. आणि ती पट्टयाची टोके कातरून मो- ठ्या प्रयत्नाने बाहेर काढिली, तेव्हा त्यांत पांढऱ्या रंगाची भुकटी सांपडली. आणि रावजीने तत्काळ कबूल केले की नरस यानें मला पाहिल्यानें जी भुकटी दिली होती त्यापैकी ही भुकटी आहे. डाक्टरास परिक्षा करण्याकरितां ती भुकटी दिली. डाक्टाराने जो रिपोर्ट केला त्यावरून असे समजते की, ती भुकटी पांढया सोमला ची आहे. त्या रीतीने चौकशी केल्यावरून ही भुकटी सांपडली; त्यावरून मला कोणत्याही प्रकारचा अंदेशा नाही, कीं, रावजी य स नरस आणि सालम यांच्या. द्वारे गायकवाडांकडून कर्नल फेर यांस विष देण्याकरिता ज्या भुकच्या दिल्या त्या पैकी ही नाही. कर्नल फेर यांचा बटलर पेद्र हा गायकवाडांस भेटत असे, आणि त्यांस महारा- जांनी त्याच्या धन्यास विषप्रयोग करण्यवयीं पिचारले होते, असे रावजी या हकी- गतींत आहे; व मुंबईस त्याची जबानो घेतली त्यांत तो गायकवाडांस कर्धी भेटलों नाहीं ह्मणून ह्मणतो. परंतु सालीमच्या द्वारें मागितल्या वरून साठ रुपये आण स दिले असें कबूल करतो. आणि साकीनयान महाराजांस भेटण्याविषयीं आग्रह केला, परंतु तो गोष्ट कबूल केली नाहीं, असे सांगतो. ू रावजीच्या पुराव्यावर शंका घेण्यास काही कारण नाहीं. कारण कीं, त्याच्या सांगण्यापैकी, पुष्कळ गोष्टी अगदी खन्या झाल्या आहेत आणि पेद्र याजवर खो- टा आरोप आणण्याचा त्याचा काही उघड हेतू दिसत नाहीं. माझा पूर्ण खाली आहे कीं, पेद्रू महाराजांस भेटला. आणि राजवाड्यांत काय झाले याविषया रावजी- ने जे सांगितलें तें खरें आहे. ज्याने आपल्या धन्याची पंचवीस वर्षे चाकरी केली, तो आपणास एक मोठी रक्कम देण्यास काढल्यावरून आपण आपल्या धन्यास मा- रण्यास निर्लज्जपणाने कबूल केल असे स्वेच्छने कबूल करील, अशी आशा कर वत नाहीं. सन १८७३च्या आगष्ट महिन्यांत रावबहादुर गजानन विठ्ठल शास्त्री यांस सरकारांनी असा हुकूम केला होता की, देशी राज्यामध्ये काहीं फंद फितूर कर ण्याची हालचाल चालली आहे, असे ऐकण्यात आले आहे. ती गोष्ट खरी आहे की काय ? याची चौकशी करावी. गजनान शास्त्री यांनी तारीख १६ आगष्ट सन १८७३ रोजी अमदाबादचे सुपरिटेंडट यांस रिपोर्ट केला आहे, तो अस्सल या पत्ता बरोबर पाठविला आहे. त्यावरून असे कळून येईल की, कर्नल फेर यांस विषप्रयोग करण्याची मल्हारराव