पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. (१७७) चार वेळां महाराजांस भेटविले. आणि शेवटल्या भेटींत महाराजानी सूचना केल्या वरून पेद्रू यानें आपल्या धन्यास विषप्रयोग करण्याचें कबूल कले. महाराजांनी रावजीस एक भुकटी दिली, त्यापासून इच्छित हेतू सिद्धीस गेला नाहीं, तेव्हां विषप्रयोग केल्याची गोष्ट उघडकीस आली यापूर्वी वीस दिवस अगोदर रावजी आणि नरसू हे संकेताप्रमाणे राजवाड्यांत यशवंतराव आणि सालम यांस भेटले आणि त्यांनी व गायकवाडांनी मिळून बेत केला कीं, रा. वजी यानें कर्नल फेर यांच्या सरबतांत विष काळवावें; आणि त्या संकेताप्रमाणे रा बजी यास नरस याजपासून दोन अथवा तीन दिवसांपूर्वी जे विष मिळाले होते तें त्यानें तारीख ९ नवंबर रोजी सरबतीत कालविलें. तारीख २३ डिसेंबर रोजी नरसू यास कैद करून लष्करी लोकांच्या पहान्य तं दिला. दुसरे दिवशीं नरसू याच्या विनंतविरून त्यास माझ्या समोर आणिला. ते- व्हा त्याने काहीं एक अट करून न घेता अपराध कबूल केला. परंतु तपशीलवार हकीगत ऐकून घेण्यापूर्वी मला हें उचित दिसलें की, आपणांस ही गोष्ट कळवावी; आणि आपण स्वतः तो काय ह्मणतो तें ऐकावें, आणि आपल्या मनाची खात्री क रून घ्यावी कीं तो स्वेच्छेनें कबूल करीत आहे, आणि त्याजवर काहीं दाब घातला नाहीं, किंवा माफीची आशा दिली नाही. आपण रास आपल्या समोर आणवून बजावून सांगितलें कीं, तूं माफीची आ. शा धरूंनको, तुजला खरोखर माफी देण्यात येणार नाहीं; हे ऐकून नरसू यानें त्याचें पागोटें अपल्या पायावर ठेविले, आणि ह्मणाला कीं तुझी मला फांशी द्या, अथवा डोके उडवा, परंतु जी गोष्ट मला माहीत आहे ती सांगून माझें मन मला हळकें करावयाचें आहे; आणि मग त्याने सर्व तपशीलवार मजकूर सांगितला, आणि तो मी तारीख २६ दिसेंबर रोजी लिहून घेतला. रावजी आणि नरसू यांस वेगवेगळ्या तारीखेस कैद केले व निरनिराळे जागीं ठेविले होते, व त्यांच्या नव्यें कांहीं दळण वळण होऊ दिले नाहीं असे असता त्यां घ्या हकीगतीचा मुद्याच्या गोष्टींशी मेळ आहे; हें खरें आहे, कीं, कांहीं क्षुल्लक गोष्टी मध्ये स्वाभाविक तफावत आहे, तथापि त्या योगाने त्यांच्या हकीगतीस कां- ह्रींशी पुष्टी येते आणि त्यांच्यामध्ये काही संगनमत किंवा मिलाफ होता असा कोणी संशय वेईल तर त्याची ही निवृत्ति होते. रावजी अणि नरसू, यांच्या कबुलीस जगा आणि काभाई, यांनी सांगितलेल्या हकीगतानें बळकटी येते. ते दोघे ह्मणतात की, कितीएक वेळा आह्मी रात्रीच्या वेळेस रावजी बरोबर राजवाड्यांत गेलो होतो आणि कवीं कधीं नरसूही येत होता. आणि जगा सांगतो कीं, गवजी यास यशवंतराव यांचे घरून कारकुनानें पांचशे रूपये माझे समक्ष दिले. तारीख २५ दिसेंबर रोजी डिटेक्टिव्ह आफिसर यांनी रावजीस विचारिलें कीं तूं विपाच्या भुकच्या कोठे ठेवीत होतांस ? रावजीनें थोडासा विचार करून सांगि २०