पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. दाउद नांवाच्या गाडी हांकणाराव्या सांगण्यावरून असे कळून आले की, त्यांनीं अमिना नांवाच्या आय्यास एके रात्रीं बैठाच्या शियामांत बसवून गायकवाडाच्या हवेळीस नेलें होतें. अमिना इचा नवरा रोख अबदुल यानी दाउद यांजकडून शि ग्राम जोडविला. आणि अमिना हिजबरोबर तिच्या चाकरीतील छोटु नांवाचा चौदा वर्षांचा मुलगा होता. 14 छोटु आणि अमिनाचा नवरा शेख अबदुला यांनी ही गोष्ट कबूल केल्यावर अमिनाच्या घरी जाऊन तीस विचारतां तिनें तीन वेळां महाराजांची भेट घेतली ह्मणून सांगितलें. यावेळेस ती अजारी होती, ह्मणून तिची जबानी घेतली नाहीं. सोजबरोबर कोणाचें दळणवळण होऊनये म्हणून तिजवर पोलिसांचा पहारा ठेविला. आणि तारीख २८ दिसेंबर रोजी तिची जबानी घेऊन तीस रोग्याश्रयांत नेऊन ठेविलें. तारीख १९ डिसेंबर रोजी डाक्तर सीवर्ड यानीं असे कळविले की, अमिना आण- खी काही गोष्टी तुझास सांगण्यास इच्छित आहे. त्यावरून मी दुसऱ्या दिवशीं ति जकडेस गेलों, तेव्हां तिने स्वतः होऊन फार महत्वाचा मजकूर सांगितला. आणि तो मी तारीख २१ दिसेंबर रोजी लिहून घेतला. PAR PAP C • कर्नल फेर यांनी घेतलेला पुरावा मी वारंवार तपासून पाहिला. आणि प्रत्येक चाकरांस समक्ष प्रश्न केले. त्यावरून असे कळून आले की, तरीख ९ नवंबर रोजी सर्व चाकरी कर्नल फेर यांची खानगी खोली सोडल्यावर सर्वांचे मागून रावजी बाहेर आला, आणि पोलिसांस अशी खबर लाविली की, काही दिवसांपासून रावजी पुष्कळ पैसे दागिनें करण्यांत आणि दुसन्या प्रकारें खचीत आहे. रावजीस माझ्या समोर आणून त्याच्या वर्तणुकीविषयी मी तपास केला. तेव्हां त्याजविषयी मला मोठा संशय उत्पन्न झाल्यावरून मी त्यास तारीख २२ डिसेंबर रोजी कैदेत ठेविण्याविषयीं हुकूम केला. माझी आणि माझे डिटेक्टिव्ह यांची अ शी खात्री झाली कीं, विषप्रयोगासंबंधीं रावजी यास खरोखर माहिती आहे, आणि त्यावरून मी कबूल केले कीं, रावजी याणें जर खरी गोष्ट कळविली तर त्यास मा. फी देण्यांत येईल. गुन्हा शोधून काढण्यांत काय तो हाच शेवटचा उपाय होता. आणि त्यावांचन ही गोष्ट उघडकीस येणे फार कठीण होते. माफीच्या शर्तीनें रावजी यानें त्याच दिवशीं अस्तमानी मजपाशीं कबूल केले की, महाराजांच्या शिकवणीव रून मी कर्नल फेर यांच्या सरबतांत विष कालविलें. रावजीच्या हकीगतीवरून असे दिसते की, एक वर्षाहून जास्त काळापूर्वी रा बजी रात्रीच्या वेळेस महाराजांस भेटत असे. पहिल्यानें सालम आरब यानें त्याचें मन वळविलें. महाराजांच्या सांगण्यावरून रेसिडेंसीमध्यें जें कांहीं होत असे तें, रावजी महाराजांस कळवीत असे, त्यानेंच नरसू जमादार यांचें मन भ्रष्ट केले आणि गायकवाडांस नेऊन भेटविलें. रावजी आणि नरसू यांस यशवंतराव आणि सालम यांचे द्वारे पुष्कळ पैसा मिळाला. कर्नल फेर यांचा बटलर पेद्र याजला रावजी ने