पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी (१७५) नीतिमार्गाश्रयी त्यांच्या वर्गातील एखाद्या उत्तम मनुष्यानें नयाचा अतिक्रम करण तेच त्याचे दुष्टाचरण. मल्हारराव महाराज यांनी जे जे काहीं अपकार केले ते मला केले नाहींत, ब्रि- टिश सरकारच्या प्रतिनिधीस केले आहेत, असे कर्नल फेर यांचें ह्मणणें असून त्यांत मोठा अर्थ होता आणि ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांनाही तसेच गृहीत केले आहे. ते प्रमाण घेऊन पाहिले असतां कर्नल फेर यांनी मल्हारराव महाराज यांस जे जे कांहीं अपकार केले, व त्यांचें राज्य बुडविण्याचा प्रयत्न करितांना जी कांहीं अयोग्य प्रकारची वर्तणूक केली, ती कांही त्यांनी केला नाहीं आपण केली असे, त्यांस मर्यादेत ठवणें, व त्याच्या वर्तनावर नजर ठेवणे हे ज्यांचें कर्तव्य कर्म होते, त्यांनी मानण्यास तयार असलेच पाहिजे. याच सिद्धांताला गोष्ट येऊन ठेपते. कर्नल फेर यांनी लढायांत शौर्य, धैर्य, आणि पराक्रम इहीं करून जी कीर्ति मिळविली तिचे सर्वस्वी वांटेकरी जसे त्यांचें सरकार झालें, तसे त्यांच्या अनयवर्ती वर्तनांचेही त्यांस पूर्णपणे विभागी झालेच पाहिजे. सारांश कर्नल फेर यांनी आपण केलेली प्रतिज्ञा सिद्ध करण्याची सर्व सामग्री सिद्ध करून त्यानीं तारीख ४ डिसेंबर सन १८७४ रोजी सर लुइस पेली यांस रोसर्डेन्सी- चा चार्ज देऊन तारीख ५ रोजी बडोदें सोडले. त्यांच्या प्रयाणसमयीं शेवटचा सलाम करण्याकरितां त्यांच्या कृपेंतील मंडळींचा, आणि अर्जदार लोकांचा स्टेशना- वर मोठा समुदाय जमला होता; आणि त्यांस दोन्ही सरकारांकडून त्यांच्या योग्यते- प्रमाणे लष्करी मान देण्यांत आला होता. रोसडेंट यांस विषप्रयेग केल्या बद्दलच्या गुन्ह्याचा शोध लावण्याविषयी इंडिया सरकारांनी सर लुईस पेली यांस हुकूम केला होता. आपण स्वतः याबदलची चौकशी करावी, हे त्यांस योग्य दिसले नाही. सबब मुंबईचे पोलिस कमिशन- 7 र सुटर साहेब यांस तपास करण्याकरितां पाठविण्याविषयीं मुंबई सरकारांस विनंती केल्यावरून त्यांनी ती मान्य केली, आणि सूटर साहेब खान बहादुर मीर अकबर अल्ली व मीर अबदुल अल्ली, व दुसरे निवडक पोळेसचे लोक घेऊन तारीख ९ डिसेंबर रोजीं बडोद्यास दाखल झाले. आणि त्यांच्या बोलावण्यावरून तारीख १० डिसेंबर रोजीं अमदाबादेहून गजानन विठ्ठल आपल्या भरंवशाच्या पोलिस लोकांसह व एजंटासह बडोद्यास आले. या गुन्ह्याचा पत्ता आपणास कसा लागला याबद्दल सूटर साहेब यांनी सर लुईस पेली यांस रिपोर्ट केला, त्यांतील तात्पर्य असे आहे की, :- तारीख १६ डिसेंबर पर्यंत तर याबद्दल मला काहीच पत्ता लागला नाही. त्या दिवशीं पोलिसास अशी बातमी लागली की, एका रात्री क्यांप मधील एका गाडी हकणाराने बैलाच्या गाडीत कर्नल फेर यांच्या चाकराँतील एका आय्यास गायक- बाडाच्या हत्रेलीकडेस नेलें होते; आणि या पासूनच सर्व पत्ता लागला आहे. 2018 Pal