पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१७४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. 84 २ नवंबर रोजी खलिता लिहिला आहे, त्यांत विचारिले आहे की, कर्नल फेर यांच्या प्रथमच्या आचरणाकडे लक्ष देतां नुसती त्यांची विद्यमानताच ही अव्यस्थित स्थिती तशीच चालण्यास पुरे आहे. उघड रीतीने हरकत करण्याचा त्यांनीं जो मा- र्ग स्विकारिला आहे, त्या योगाने माझ्या कामांत फार अडचणी आल्या आहेत; आणि ह्मणून मला आपल्याकडे फिर्याद करणे भाग झाले आहे. यास्तव अशा स्थि- तीत मला ठेविलें असतां माझी परीक्षा पहाण्याकरितां मला योग्य रीतीची सवड दि. ली असे ह्मणता येईल किंवा नाहीं याना आपणच विचार करावा. याच खलियांत दुसऱ्या एके ठिकाण असे लिहिले आहे की, रोसेडेंटाच्या अशा प्रकारच्या वर्तनांपासून मुसलमान लोकांच्या शिरजोर वृत्तीला आणि राजद्रोहाला उत्तेजन दिल्याचें श्रय येतें. कर्नल फेर यांच्या लेखासारखा दादाभाई यांचा लेख दांगा आणि अयोजक शब्दांनी भरलेला नाहीं. तो खलिता मोठ्या शहाणपणाने तयार केला होता. व ब्रिटिश सरकारच्या रेसिडेंटाच्या हुद्याकडेसच नाहीं, पण कर्नल फेर यांच्या स्वत:च्या योग्यतेकडेस लक्ष देऊन त्या खलित्यांतील शब्द योजना अशी कांहीं उत्तम केली होती कीं कर्नल फेर यांजवांचून दुसरा कोणी शहाणा मनुष्य त्या खलित्यांतील योग्य हेतूंविषयीं, व लेखाच्या सभ्यपणाविषय, दोष देऊ शकणार नाहीं. कर्नल फेर आ- णि दादाभाई यांच्या सौजन्यपणामध्ये जितकें अंतर तितकें कर्नल फेर यांच्या रिपो- टाँतील आणि दादाभाई यांनी लिहिलेल्या खलित्यांतील भाषेंत आहे. वस्तुतः गर्भित अर्थाने महाराज यांनी गवरनर जनरल यांस असेच विचारले आहे की जो रेसिडेंट माझा छळ करीत आहे, माझ्या शत्रूला आणि माझ्या प्रजेला आश्रय देऊन माझा विरुद्ध कारस्थानें करण्याविषयीं उत्तेजन देत आहे, आणि त्यांस मर्यादेत ठेवणें हैं ज्याचें काम आहे ते त्यांच्या वर्तनाकडे अलक्ष करून मला दाद देत नाहीत, व मला योग्य सामा मिळत नाहीं, तर अश। रेसिडेंटाच्या जाचांत मीं रहावें तरी कोठपर्यंत सारांश कर्नल फेर यांनी, विषप्रयोग करविण्यांत महाराजांचे अंग आहे, हा सि. द्धांत जसा त्यांनी महाराजांच्या आचणांवरून सिद्ध करून दाखविला आहे, तसा मल्हारराव महाराज यांचें राज्य लयास नेण्याविषयीं कर्नल फेर यांचा दृढनिश्वय झाला होता हा सिद्धांत त्यांच्या वर्तनांवरून आपल्यास देखील सिद्ध करून देतां आला आहे. आतां मव्हारराव महाराज यांजवर जे दुष्ट दोष आणिले आहेत ते जर खरे अ सतील तर तशा प्रकारचे दोष कर्नल फेर यांजकडून घडले नाहीत, आणि घडतील तरी कसे ! जें कार्य एका नखानें सहज करता येतें, त्या कामासाठी तरवारीचा उपयोग कोण करील ? कर्नल फेर यांच्या पेनाच्या अग्रानें जें कार्य सहज होणार होते, तें कार्य घडवून आणण्यास दुसरे दुष्ट उपाय योजण्याचें त्यांस प्रयोजन तरी काय? आणि सोमलाच्या भुकटीपेक्षां त्याच्या पेनांत जें विष भरलें होतें तें कोठें कमी घातक होतें? जो देश नीतीचें माहेर घर आणि ज्या देशांतील लोक नीतिशिक्षक आणि केवळ