पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. ( १७३ ) वर्तन केले त्याबद्दल आजी सोळाव्या भागांत विस्तारपूर्वक सांगितलें आहे. त्यांतील वेंवे घेऊन हा ग्रंथ वाढविण्याची आह्मांसही कांही अवश्यकता नाहीं. जो कार्यभाग साधण्यासाठी मल्हारराव महाराज यांनी एकसा- रखा तेरा वर्षे प्रयत्न करून एकदांचे राज्यपद मिळविले त्याचप्रमाण कर्नल फेर यांनी तारीख १७ मार्च सन १८७३ रोजीं रोसडेंटाचा चार्ज घेतल्यापासून तारीख १७ नवंबर सन १८७४ रोजी विषप्रयोग प्रकरणी त्यांनी रिपोर्ट केला तोपर्यंत बरोबर बोस नहिन्यांत अनेक उपाय करून मल्हारराव महाराज यांचे राज्यपद हि- सकावून घेण्याचा आपला उद्देश एकदांचा सिद्धीस नेला. पहिल्याने त्यांनी मल्हारराव महाराज यांजवर इंग्रज सरकाराबरोबरचे कौलकरार मोडल्याबद्दल, व यांच्या प्रजे- वर जुलूम केल्याबद्दल, आरोप आणिले. राज्यकारभार वाईट रीतीने चालविल्यामु ळे राज्यांत भयंकर बखेडे होऊं लागले आहेत, आणि तेणेकरून ब्रिटिश सरकार. च्या राज्याची शांति आणि स्वस्थता भंग होऊ पहात आहे; असे दोष आणून ते. नाती फौजेच्या संबंधानें खोटीं गान्हाणी सांगितलीं; आणि सर रिचर्ड मीडच्या क.. मिशनाची नेमणूक करविण्यास कारणीभूत झाले. तसे करून आपला इच्छित हेतु सिद्धीस जात नाहीं, असे त्यांस समजले, तेव्हां तारीख ९ फेब्रुवारी सन १८७४ रो- औं एक छात्र रिपोर्ट करून मल्हरराव महाराज यांच्याविषयीं मुंबई सरकारचें, मन जास्त विटविण्याचा प्रयत्न केला. हा रिपोर्ट ब्ल्यू बुत छापिला नाहीं, हे फार वा- ईट झालें; नाहीं तर यांतून देखील किती एक गोष्टी बाहेर आल्या असत्या. कमिंश- नच्या रिपोर्टर्डावर गवरनर जनरल यांचा ठराव होऊन महाराजांस अठरा महिन्यांची मुदत मिळाली; आणि कर्नल फेर यांची पराकाष्ठेची हरकत असतां दादाभाई दिवाण झा- ले, व त्यांनी आपल्या मदतीस खान बहादुर काजी शाहाबुद्दीन आणेि बाळा मंगेश बगैरे शाहणी मंडळी घेतला; तेव्हां कर्नल फेर यांस वाटले कीं, आतां राज्यकार- भारत सुधारणूक होऊन मल्हारराव महाराज यांचे राज्य चिरायु होणार; तेव्हां ते दादाभाईचे वैरी होऊन बसले आणि त्यांच्या राज्यकारभारांत तितक्या हरकती आणवतील तितक्या आणल्या. तथापि देखील त्यांस आपला हेतू सिद्धीस जात नाही असे वाट; तेव्हां तारीख २ नवंबर सन १८७४ रोजी रिपोर्ट केला यांत दादाभाईच्या कारकीर्दीतील राज्यकारभार पूर्वीपेक्षां पराकाष्ठेनें वाईट चालला आहे असे मिथ्या दोष आणून महाराजांवर राजद्रोहाचे देखील बालंट भाणण्याचा डौल घातला. आणि शेवटी विषप्रयोगांत महाराजांचे अंग आहे असा यांजवर आरोप आणून सगळ्या हिंदुस्थानांत चहूंकडे हाहाःकार करून सोडला. : फार तर काय पण कर्नल फेर यांनी तारीख १७ नवंबरा रिपोर्टाच्या शेवटी मुंबई सरकारास जसे विचारलें कीं, जो राजा पराकाष्ठेचा खुनशी आणि दुष्टबुद्धीचा आहे असे हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहे, त्या राजाच्या दरबारांत अशा संकटांत ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधींनीं रहावें तरी कोठपर्यंत? काहींसें त्याच डौलानें दादाभाई यांनी महाराजांचे नांवें नामदार गवरनर जनरल यांस तारीख