पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास संकल्प केला होता, हा सिद्धांत त्यांच्या आचरणांवरून आपणांस सिद्ध करून दा- खवितां येतो कीं काय ? याविषयीं आपण प्रयत्न करून पाहू. आपणास विषप्रयोग करण्यांत आला याविषयी कर्नल फेर यांस असा संशय ना- हीं, तसाच मल्हारराव महाराज हे बडोद्याचे राजे नसावेत असे कर्नल फेर यांच्या मनांत पक्के भरलें होतें, याविषयीं आझांस ही संशय नाहीं; मग महाराजांचे वर्तन चा.. गर्ले नव्हतें ह्मणून त्यांचा त्यांस इतका तिटकरा आला असो, किंवा ह्या हाडवैराचें दुसरें कांहीं कारण असो, त्याविषयीं आपल्याच्याने निश्चयपूर्वक सांगवत नाहीं. पण त्या पवित्र मनाच्या रेरोसैडेटाच्या चित्तांत पहिल्या खेरीज दुसरे कांहीं कारण असेल असे वाटत नाहीं. मल्हारराव महाराज यानी आपल्या पूर्वाश्रमांत राज्य मिळविण्याकरितां नाना प्रकारचीं दुष्ट कर्म केल्याबद्दल कर्नल फेर यांनी एक लांच मालिका सांगितली असून गादीवर आल्यानंतर त्यांनी चहूंकडे हाहाःकार करून सोडिला, असे सांगितले आहे, तशा प्रकारची दुष्ट कृत्ये करून मल्हारराव महाराज यांचे राज्य बुडविण्याचा कर्नल फेर यांनी प्रयत्न केला नाही असे आह्मांस आरंभी सांगून ठेविलें पाहिजे. आणि त्याजबरोबर आणखी असे हो सांगून ठेविले पाहिजे की, मल्हाररात्र महाराजांच्या संबंधाने कर्नल फेर यांचें वर्तन ज्या राष्ट्राचे कर्नल फेर रोसडेंट होते, त्या जगविख्यात न्यायी राष्ट्राच्या मोठेपणाला, कर्नल फेर यांच्या स्वतःच्या योग्यतेला, त्यांच्या सुशि क्षीत अवस्थेला, आणि ख्रिस्ती धर्माच्या संस्काराने पवित्र झालेल्या त्यांच्या मनाला साजेल असे नव्हते. जवळ कांडी साधन ना मल्हारराव महाराज गादीवर आल्यापूर्वी त्यांच्या आचरण विषयों कर्नल फेर यांनी जी हकीगत सांगितली आहे, त्याप्रमाणे कर्नल फेर बडोद्याचे रोसडेंट झाले त्यापूर्वी त्यांचें आचरण कसे होते, याजविषयांची माहिती सांगण्यास भाला- तथापि त्यांच्या नावास ज्या पदव्या जोडल्या आहेत सां. वरून ते मोठे पराक्रमी आणि शूर सरदार आहेत, याविषयीं कांहीं भ्रती नाहीं. तो भेकड राजा कोणीकडे ? आणि मोठनोठया लढाया मारून प्रख्यातीस आलेला तो शूर सरदार कोणीकडे ! ! पण ते राजाच्या दरबारांत नाजूक कार्मे करण्याच्या उपयोगीं नाहींत, असे तर त्यांचे यजमान मुंबईसरकार यांनी स्पष्ट झटले असून, ते सिंधमध्ये राजकीय कामावर असतां त्यांस सक्त ठपका देण्यासारिखा त्यांजकडून कांहीं अविचार झाला होता, असे बाहेर आले आहे. यावरून ते बडोद्याचे रेसिडेंट झाले त्यापूर्वी त्यांच्या अब्रूला कांहीं कलंक लागला होता, असे दिसून येतें; मग तो निवारण झाला किंवा नाहीं, याविषयी आह्मांस काही माहिती नाहीं. मल्हारराव महाराज गादीवर आल्यानंतर त्यांनी कोणत्या रीतीनें राज्यकारभार चालविला त्यावद्दल सर रिचर्ड मीडच्या कमिशनांतील वेंचे घेऊन आपला रिपोर्ट बाढविण्याची कर्नल फेर यांस जशी अवश्यकता नव्हती, तशी कर्नल फेर यांनी रोसिडेंटाचा चार्ज घेतल्यावर मल्हारराव महाराज यांच्या संबंधानें कोणत्या सेती में