पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. (१७१) केले होते हैं आपणास त्या कमिशन संबंधों हकीगतीवरून दिसून आले आहे. पण तितकें करून ही कर्नल फेर यांची इच्छा तृप्त झाली नाही. महाराजांनी नाटक करवून कमिशनच्या अधिकाऱ्यांचा आणि माझा तिरस्कार आणि उपहास केला, असाही त्यांजवर आळ घेतला, आणि तारीख ९ फेब्रुवारी सन १८७४ च्या रिपोटांत तर त्यांनी महाराज यांजवर पुष्कळ लाथा झाढिल्या आहेत, असे विषप्रयोग संबंधी रिपोटांत त्या रिपोर्टाचा जेथे जेथे संबंध दाखविला आहे त्यावरून दिसतें. मल्हाराव महाराज यांनी नाटकाप्रमाणे खेळ करून कमिशनच्या अधिकाऱ्यांची निर्भर्त्सना केल्याबद्दल कोणी रोसेडेंट साहेब यांस बातमी सांगितली होती, असे दरबारचे कामदार लोकांस तेव्हांच समजले होते, व त्या बद्दल त्यांनी चौकशी ही केली. होती. परंतु त्या गोष्टांपैकी काही तरी खरे असेल तर त्यांत शोध लागेल ना? आपले रा ज्य लयास नेण्याची अथवा बचाविण्याची सत्ता कमिशनच्या अधिकान्यांच्या हातांत आहे, असे महाराज यांनी मानलें होतें; त्यांनी नाटकांतील सोंगाप्रमाणे क मिशनच्या अधिकाऱ्यांची सोंगे आणवून त्यांचा उपहास केला असेल, असे संभवते तरी का? पण कर्नल फेर तर हात धुवून त्यांच्या पाठीस लागले होते आणि मुंबई सरकारांस त्यांचे लेख धर्मशास्त्राप्रमाणे मान्य होते; तेथे त्या हीनभाग्य राज ने करावे तरी काय? कमिशन यानी आपले काम आटपल्यानंतर तारीख ९ फेब्रुवारी सन १८७४ रोजी कर्नल फेर यांनी मुंबई सरकारास जो रिपोर्ट केला होता, त्याचे काहीं तरी प्रयोजन होतें का ? त्यांस जी कांहीं हकीगत कळवावयाची ती त्यांनीं कमिशनास कळविली होती, आणि कमिशनाच्या रिपोटीवरून गवरनर जनरल यांचा शेवट निकाल व्हावयाचा होता. असे असतां मध्यंतरी कर्नल फेर यांनी एक लांब रिपोर्ट करून त्यांत मन्दारराव महाराज यांच्या पूर्वाश्रमांतील उखाळया पाखळ्या काढण्याची काही तरी जरूर होती का? पण नाही! तक्षकाप्रमाणे यांनीं डाव धरला होता तो होताच. विषप्रयोग प्रकरणी त्यांच्या रिपोटातील वागविन्यास किती दारुण आहे तो पहा. कर्नल फेर रूपी तक्षकानें कलम रूपी विषदंतानें मल्हारराव महाराज यांच्या मर्मस्थानीं अनेक क्षों केली आहेत, असें रूपक केले तरी शोभण्यासारखे आहे. तेव्हां मल्हारराव महाराज वन्चितात कसे ! त्या सगळ्या रिपोटातील प्रत्येक शब्द वै. रद्योतक असून अप्रयोजक शब्दांनी तो सगळा रिपोर्ट व्यापून टाकला आहे. मल्हा- रराव महाराज यांनी कर्नल फेर यांस कांहीं एक अपकार केला नव्हता, तेव्हां दे- खील त्यांची वाक्पयोजना अशनी सारखी कठोर आणि अनर्थोत्पादक होती; आणि आतां तर त्यांस माझ्या दरबारांतून काढावें, असे महाराजांनी हिंदुस्थान सरकारांस लिहिले होते; इतका मोठा अपकार झाल्यावर त्या द्विट्कुललयदक्ष तक्षकासारख्या उम्र स्वभावाच्या रेसिडेंटास क्षमा कशाची ! ! विषप्रयोग करविण्यांत मल्हारराव महाराज यांचें अंग होतें, असा कर्नल फेर यां. नीं सिद्धांत करून तो महाराज यांच्या पूर्वाचरणावरून जसा त्यांनी सिद्ध करून दा.. खविला आहे, तसा मल्हारराव महाराजांचें राज्य बुडविण्याविषयों कर्नल फेर यांनी