पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. च्या अमलांत ब्रिटिश सरकारची अब्रू आणि हित, आणि पंचवीस लक्ष प्रजेचें कल्याण सुरक्षित नाहीं. सन १८७२च्या सालापासून ह्या राजास सुचना करण्यांत येत असत त्यांस जनदया, राजनिष्ठा, आणि न्याय, हे अगदीं तुच्छ झाले आहेत. मी ह्या राजाब- रोबर प्रेमानें आणि क्षमा धारण करून वागलों, असे प्रतिपादन करण्यास शक्त आहे. यास्तव सार्वजनिक हितासाठी सरकारांनी माझे पूर्णपणे संरक्षण करावें, असा . माझा हक्क आहे; आणि मला स्वातरी आहे की ह्या राजाला जर किंचित् क्षमा केळी - तर लोकांचे हित कधीही होणार नाही, कारण कीं या जगांतील प्रत्येक भागांत ज्या •नियमानें राज्यकारभार व लोकव्यवहार चालतात त्या नियमांशीं या राजाच्या वर्त- णुकीचा अगढ़ीं विरोध आहे.

  • आतां हा रिपोर्ट पुरा करितांना मी येवढे सांगतों की माझा प्राण घेण्याचा

सांप्रतचा प्रयत्न जरी निष्फळ झाला आहे तरी महाराजांचें हित साधण्यासाठी ज्या लोकांनीं विंडे उचललेले आहेत, त्या लोकांनी आपले उद्देश टकून दिले नाहीत. मा- झ्या दुमाल्यावर हेर ठेविले आहेत, अशी मा सूचना केली असून, मी स्वतःही त्यांस पाहिले आहे. त्या खेरीन मा पोष्टांतून मित्राचाराची पत्रे आली आहेत, की, तुह्मी फार सावधगिरीने आणि दूरवर विचार करून वागावें. यास्तव मी सरकारांस असे विचारितों की, जो राजा पराकाष्ठेचा खुनशी आणि दुष्ट बुद्धीचा आहे असे हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहे, आणि जो क्षणिबुद्धीचा आहे, सबच त्याच्या कृयांची जबाबदारी त्याजवर ठेवितां येत नाही, असे मानले आहे, त्या राजाच्या दरबारांत ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधीनी अशा संकाटांत कोठयंत रहावें ? सदई प्रमाणे कर्नल फेर यांच्या रिपोटांतील तापये आहे. या रिपोर्टावरून एक दोन गोष्टी आपणास नव्या कळून येतात. एक तर सर रिचर्ड मीडचें कांमेशन उठून गेल्यावर, महाराजांपुढे नाटकासारखा एक खेळ करून कमिशनच्या सभास दांचा आणि रोसेडेंट यांचा महाराजांनी उपहास केला होता, असे कर्नल फेर यांनी मुंबईसरकारास जाहीर केले होते. आणि दुसरे तारीख ९ फेब्रुवारी सन १८७४ रोजी नंबर ३५ चा त्यांनी एक पुष्कळ कलमांचा महाराजांचे विरुद्ध रिपोर्ट केला होता. हे दोन्ही रिपोर्ट ब्ल्युचुकांत छापिले नाहीत. कर्नल फेर यांनी सर रिचर्ड मीड यांच्या कमिशनासमोर मल्हारराव महाराज यांजवर दोष लागू करण्यासाठी किती दुर्घट प्रयत्न

  • . In conclusion I have the honour to state that, although the recent attempt

on my life has failed, I have reasonable grounds for believing that those who were induced in the Maharaja's interest to compass that attempt have not abandoned their intentions. I have observed myself and have been also warned that my steps after_dark are dogged by spies; and the presence of suspicions persons in parts of camp, where they can have no ordinary business, has been oronght to my notice, I have also received by post some friendly letters counselling the utmost vigilance and forethought. For these warnings I believe there is at the present time ample ground, and I leave it for Government to decide to what extent they think that a representative of their own should be exposed to them at the court of a prince who is known to be one of the most revengeful and malicious in India, and for whose acts he has been hitherto held irresponsible on the grounds that he was of deficient intellect." (Blue Book No. 6 Pages 10-11.)