पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. ( १६९) आणि रखमाबाई, यांस ते मारून टाकणार होते. हिंदुस्थानांतील या भागांत बहुत- करून ज्यास साम्य सांपडणार नाहीं, अशा रीतीने वाईट राज्यकारभार चालवून, आणि ब्रिटिश सरकारच्या शेसेडेंटास विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करून, महाराजां- नीं आपल्या दुष्ट चरणाची सीमा केली. हळींच्या महाराजांचे तीर्थरूप सयाजीराव सन १८२०चे सालीं गादीवर बसल्या. पासून अर्शी कारस्थानें बडोद्याच्या दरबारांत चालतच आली आहेत; कांहीं नवीं नाहींत. सयाजीराव महाराज यांनीं वुइल्यम साहेब यांचा आणि आपल्या कुटुंबांतील अ. निष्ट मंडळी ह्यांचा प्राणनाश करण्याकरितां जादू करणे, मनुष्य बळी देऊन प्रयोग करविणे, आणि मंत्र जप करविण, हे उपाय योजिले होते. बडोद्याचे रेसिडेंट सदरलंड साहेब सन १८४० मध्ये ऐन आणीबाणीच्या वेळी एक- दम वारले;त्याविषयों लोकांचा समज असा आहे की, त्यांस जादू, आणि विषप्रयोग करून मारले; आणि निनामी पत्रांत एका पेक्षां अधीक वेळां मलाही त्यांच्या दैव रेषेचें भय घातले होतें. सयाजीरराव महाराज यांच्या राज्याच्या अखेरीस सर जान आऊटराम साहेब जेव्हा बडोद्याच्या राज्यकारभारांतील दोष बाहेर काढूं लागले, तेव्हां त्यांस देखील विषप्रयो- ग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी सरकारास कळविले होतें, आणि ही गोष्ट प्र सिद्ध आहे कीं, कोणऱ्या तरी रीतीने त्यांस विषयुक्त अन्न देण्यांत येईल अशा धास्तीत त्यांस पुष्कळ काळ कंठावा लागला. यावरून असे दिसून येतें कीं जो रेसिडेंट निर्भयपणाने आणि निष्पक्षपातानें आपले कर्तव्यकर्म करूं लागला, की त्याचा प्राण संकटांत असावयाचाच, अशी मालिकाच चालत आली आहे; तथापि तें संकट मल्हारराव महाराज यांच्या खुनशी स्वभावामुळे अमर्याद वाढले आहे. याप्रमाणे दोन्ही सरकारांमधील बेबनावाच्या का रणांचा शेवट परिणाम या पंथाला येऊन पोहोंचला आहे. सगजीराव यांनी पूर्वीच्या इसर गायकवाडांपेक्षा जास्त त्रास दिला, तथापि त्यांचे चिरंजीव मल्हारराव महारा- ज यांनीं त्यांस फार मागें सारिलें.

। सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी नम्रपणे सरकारांस प्रार्थना करितों कीं, ह्या राजा- ह्या

  • “ Under these circumstances, I respectfully submit that neither the honour or

interests of the British Government, or the welfare of the two and a half millions of the Baroda State, are safe under a Prince who, in spite of all the warnings which he has had since the close of 1872, a period of two years and upwards, continues delibe- rately to set the common principles of humanity, loyalty, and justice at defiance; and I, therefore, as British representative at this court, where I am in a position to prove my personal conduct and general bearing towards His Highness the Gaekwar to have been marked by kindness and forbearance, claim the substantial protection of Government on behalf of the general interests which are at stake, which, I feel assured, will not be promoted by the least concession to a Prince, who from 1857 to the present time appears from the evidence recorded to have had his own way, however opposed to the laws that regulate all political and 'social relations in every part of the world." ( Baroda Blue Book No. 6 Page 10.)