पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सन १८७४ च्या मार्च महिन्यांत आम्ही नवसरीस गेल्यावर महाराजांनीं सालम आरब, आणि माधवराव काळे, वगैरे आपल्या भरवशाचीं मनुष्यें मो रहात होतो त्या बंगल्यास लागून माझ्यावर हेरपणा करण्यासाठी ठेविली होती. त्याच वेळेस निना- मी पत्रांनी मला कोणी सूचना केली की, या मनुष्यांची सन्निधता घातक आहे. याच संधीत तो दिल्लीचा हकीमहो तो जादूची शिशी घेऊन नवसरीस आला होता; आणि मला कोणी असेही सांगितले होते कीं तो तुमच्या बंगल्यास आला होता. त्याचा उद्देश कोणताही असो, पण तो कपटयुक्त आणि ब्रिटिश सरकाराला अपमा- नप्रद होता. मी त्याला पाहिले असते तर त्याबद्दल चौकशी केली असती. दादाभाई नवरोजी यांनी आकसखोरीनीं तारीख ९ मे सन १८७४च्या खलित्यां त मजवर खोटा दोष आणिला. त्या समयास मला पुन्हा एक लांब निनामी पत्र पावले. त्यांत माझा आणि माझे नेटिव्ह असिस्टंट मणिभाई, यांचा घात करण्याचा बेत योजिल्याबद्दल मला कळविलें होतें. आणखी त्या पत्रांत असे लिहिले होतें कीं, माझ्या बटलराकडून मला विषप्रयोग करविणार आहेत. बटलर हा शब्द फैजू चोप- दार यांत उद्देशन लिहिला होता, यांत संशय नाही. सुदैवाने मी त्यास बडोद्यास ठेविल्यामुळे नवसरी येथे विषप्रयोग करण्याचे साधलें नाहीं. मी माझ्या बटलरास ( तो पराकाष्ठेचा विश्वासूक असून भरंवसा ठेविण्यास पात्र आहे, आणि त्याने पंच- वीस वर्षे झालीं, माझी सेवा केली आहे. ) चेतवून ठेविले होते की, त्वां सालम आरब, अगर महाराजांच्या चाकरीतील कोणत्याही मनुष्यास कोणत्याही निमित्यानें स्वै पाकाच्या खोलीजवळ येऊ देऊ नये. लक्ष्मीबाईबरोबर महाराजांनी लग्न केलें, तें सरकारांनी मान्य केले नाही, त्याबद्दल महाराजांस जो अनावर राग आला होता, त्याच्या झपाड्यांत यांनी फैजू चोपदार नवसरीस हजर असता तर त्याजकडून मला तेथेंच विषप्रयोग करविला असता. लक्ष्मीबाईस पुत्र झाला त्यास सरकारांनी गादीचा वारस कबूल केला नाही, मुळे महाराजांनी मजवर तारीख २ नवंबरच्या खलित्यांत दुसऱ्याने आकसखोरीचा दो- षारोप केला आहे. ह्या आणि दुसऱ्या अनेक प्रमाणांवरून उघड रीतीने असे दि सून येतें की, मी बडोद्याच्या दरबारचा रेसिडेंट या नात्याने महाराज मजविषयीं द्वेषभाव ठेवितात. सन १८५७पासून ह्यावेळेपर्यंत महाराज कशी कारस्थानें करीत आले आहेत, त्या- विषयीं मीं संक्षिप्त वृत्त निवेदन केले आहे. सरजंट मेजर हिगिन्त, * राणीसाहेब जमनाबाई

  • तात्याशास्त्री यांनी खंडेराव महाराज यांस मारून टाकण्याविषयों, ज्या साहेबांचे मन वळ-

विण्याचा यत्न केला होता, तो हा हिगिन्स. त्यानी ती गोष्ट तात्काळ रोसडेंट यांस श्रुत केल्याव रून हें कारस्थान उघडकीस आलें. मल्हारराव महाराज पादरें येथें कैदेत असता त्यांच्या मंडळी पैकी कोणी, हिगिन्स यानें गोष्ट फोडली त्याबद्दलचा सूड उगविण्यासाठी, त्याजवर गोळी घातली परंतु ती चुकली असें म्हणण्यात आले आहे. त्यास बडोद्याच्या कापातून काढून दुसरीकडे पाठ- विणे भाग पडलें खडेराव महाराज यांनी त्यांस योग्य बक्षीस दिले होतें.