पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. (१६७ ) कसे वर्तन केले, त्याविषयों मीं रिपोटांत लिहिले नाहीं. तें आतां लिहावयाचे आहे. तारीख १८ मार्च सन १८७३ रोजी मी बडोद्यांत आल्यावर सुमारे चार महि न्यांनीं द्रव्य संबंधानें माझी इच्छा काय आहे, असे महाराजांनी एका जुन्या साव काराच्या द्वारे मला विचारावले होते. तो सावकार ह्मणाला कॉ, मला महाराजांनी पाठविले. मी त्याच सावकाराबरोबर महाराजांस असे सांगून पाठविले की, आपले आणि आपल्या प्रजेचे कल्याण व्हावें, अशी माझी इच्छा आहे; आणि तो पूर्ण झाली झणजे मळा सर्व काही मिळाले असे होईल. यावेळेपासून ह्यावेळेपर्यंत म ला प्रत्येक महिन्यांतून एक किंवा दोन पत्रे पावतात. त्यांत मला नानाप्रकारची भये दाखविण्यांत येतात. त्या पत्रांपैकी बहुतेक पत्रांत प्रत्येक गोष्टीबदल सरकारास रिपोर्ट करण्यापासून मी दूर रहावें, आणि दरवारांस आवडत नाही त्या विषयाबद्दल दर- बाराबरोबर पत्रव्यवहार करूं नये; केला असतां, जादूनें विषप्रयोग करून, अथव गोळी घालून प्राण घेण्यांत येईल, अशी धमकी दिलेली आहे. सन १८६७ चे सालीं, ह्याच साधनांनी खंडेराव महाराज यांचा प्राणांत करण्याचा प्रयत्न करण्यांत आला होता. ही गोष्ट लक्षांत ठेविण्या जोगी आहे.

ह्याच कालपरिमाणाच्या आरंभाला 'जादूचा काल' अशी संज्ञा दिली पाहिजे. महाराजांच्या चाकरीतील दिल्लीचा हकीम मध्यम परिमाणाची एक शिसी घेऊन बडोद्यांत फिरत असे. या शिशीच्या आंत इंग्रजी आणि पारशी अक्षरांनी माझे नांव लिहिले होते, हे कृत्य कितीही विवेकशून्यतेचें असो, परंतु ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, ज्या लोकांचा जादूवर विश्वास आहे, त्या लोकांस रोसडेंट महाराजां. च्या जादूगराच्या मुठीत आहे, असे दाखविण्याकरितां हें कृप केले होते. ह्या गो ष्टींत महाराजांची प्रेरणा, अथवा अनुमती, असल्यावांचून रेसिडेंटाच्या संबंधानें उघ ड रीतीचें असें वर्तन महाराजांच्या चाकरतिील लोकांपैकी कोणाच्यानेही करव नसतें. महाराजांनी स्वतः देखील त्या शिशीबद्दल एक किंवा दोन वेळां मजबरोवर भाषण केले होते; आणि जादूवांचून बारीक गळ्याच्या शिशीमध्ये नांव कसे लिहिले जाईल असे मला विचारिलें होतें. जादू खरी आहे असे भासवून मला भि विण्या- चा व माझा अपमान करण्याचा महाराजांचा उद्देश आहे, असे मी त्यावरून ताडिलें; परंतु मी त्या गोष्टीकडे कांहीं लक्ष न देतां ऐकिलें न ऐकिळे केले.* त्यानंतर सन १८७४ च्या जानेवारी महिन्यांत महाराजांच्या समोर नाटकसंबंधी खेळ करून कमि- शनच्या सभासदांचा आणि रेसिडेंट यांचा तिरस्कार आणि उपहास केला. त्याच- द्दल मी पूर्वी रिपोर्ट केला आहे.

  • “ Next in order to this occurrance came the contempt and ridicule which were

thrown upon the members of the Commission and the Resident in a dramatic per- formance which took place before His Highness the Maharaja in Jannary 1874, as already reported to Government." ( Barods Blue Book No. 6 Page 8.)