पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. राव महाराज यांचा प्राण घेण्याचा बेत ठरला होता. त्या कृत्यांशी हल्लीं गेसिडेंट यांस विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यांत आला, त्याचे सादृश्य कसे बरोबर ज मतें तें लक्षांत ठेवण्यासारिखें आहे. दुसरी एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, तात्याशास्त्री यानें तें पातक कबूल केले असून, त्यांस जन्मपर्यंत कैदेत ठेविण्याचे शासन झाले असता, त्यास, आणि याच मोकदम्यांतील दुसरे लोक, कैदेत जिवंत राहिले होते त्यांस, मल्हारराव महाराज यांनीं राज्याधिकार प्राप्त झाल्या बरोबर सोडून दिलें. हा एक मल्हारराव महारा- ज यांच्या अपराधास ज्यास्त पुरावा झाला आहे. मल्हारराव महाराज यांस जरी कैदेत ठेविलें होतें, तरी खंडेराव महाराज यांचा जीवितापहार करण्याची कारस्थानें चालू होतीच. सन १८६७ च्या साठी पुन: एक कारस्थान केले, त्यांत खंडेराव महाराज यांस मारावें आणि आपण गादी मिळवावी हाच मल्हारराव महाराज यांचा उद्देश होता. त्या कारस्थानांत वि सांहून अधीक मनुष्यें होती, त्यांपैकी काहीं ठार मारिलीं, आणि काही लोकांस नि. रनिराळ्या मुदतींच्या ठेपा दिल्या. तथापि कांहीं अगदींच बचावले गेले होते. याब- द्दल मी तारीख ९ फेब्रुवारी सन १८७४ च्या रिपोर्टातील ३८/३९ कलमांत लिहि- लें आहें- - जो कार्यभाग साधण्यासाठी मल्हारराव महाराज यांनीं तेरा वर्षेपर्यंत कारस्थानें केळीं होतीं, तो कार्यभाग खंडेराव महाराज एकाएकीं परलोकवासी झाल्यामुळे अकल्पि- त साधला. राज्यसत्ता हातांत आल्याबरोबर त्यांनी जिकडे तिकडे हाहा:कार करून दिला; आणि अद्याप देखील त्यास खळ नाहीं. भाऊ शिंदे, रावजी मास्तर, गणू वाघ, मल्हारबाशेळक्या; आणि गोविंदजी नाईक, हे सर्व विष देऊन मारले, अशी लोकांची समज आहे. आणि राणी जमना- बाई, आणि रखमाबाई यांसही त्यांनी अत्यंत निर्दयपणानें वागविलें होतें, परंतु त्या- बदल कमिशनांनीं कांहीं चौकशी केली नाही. मल्हारराव महाराज यांनी तीन वर्षे राज्यकारभार कोणत्या रीतीने चालविला याबद्दल कमिशनच्या रिपोर्टातील वेचें घेऊन, हा रिपोर्ट वाढविण्याची कांहीं अवश्य. कता नाहीं. कमिशन यांनी मल्हारराव महाराज यांचें असे वर्णन केले आहे कीं, त्यांची चाल प्रधान्यत्वे करून जुलुमी, खुनशी, अनर्थोत्पादक, आणि लुटारू पणा. ची असून, लहान वर्गांच्या लोकांपासून मोठ्या वर्गांच्या लोकांपर्यंत सर्वांस त्याजयासून सारखा उपद्रव झाला आहे. आणि हा राजा असा नाहीं कीं, राज- कारभारांतील दोष दूर करून, चांगली राज्यव्यवस्था स्थापन करील, अशी आपण आशा करावी. कमिशन गेल्यानंतर राज्यांत कोण कोणत्या गोष्टी घडून आल्या, या विषयी मा तारीख २ नोवेंबर सन मजकूर रोजी रिपोर्ट केला आहे; परंतु माझ्या संबंधाने म हाराजांनी आणि त्यांचे खानगी एजंट यांनी मजबरोबर मागील सोळा महिन्यांत