पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दादाभाई नवरोजी, ( १६१) उत्तर दिले आहे. " बदसलागार लोकांस महाराजांजवळ राहू दिले याबद्दल तुमची फिर्याद आहे. ज्यांस तुझीं बदसलागार ह्मणतो त्यांस जुलमानें महाराजांपासून दूर क रावें ही गोष्ट गवरनर इन कौन्सिल यांस अगदी उचित वाटत नाहीं. पुष्कळ प्र करणांत असे अनुभवास आलें आहे कीं, ज्यांस तुझी बदसलागार ह्मणतां ते लोक केवळ राजाच्या मनांत पूर्वी पासून आलेले विचार आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्या चीं साधनें माल आहेत, आणि एक झुंड काढून टाकिली तर त्यांच्या जागी दुसरी ज्यास्त प्रबळ झुंड स्थापन होईल एवढा मात्र त्या कृत्याचा परिणाम होईल. रामा वाघ यास काढून दिल्याचें या ह्मणण्यास प्रमाण आहे." असें त्या लेखांतील तात्पर्य आहे तें दादाभाईंनी लक्षात घेतले असता त्यांस असे कळून येईल कीं, ज्या लो- कांस बाहेर काढून दिल्याने आपला राज्यकारभार सुरळीत चालेल असे आपणास वाटले होते ती देखील मोठी चूक होती. मल्हारराव महाराज यांनी दादाभाई यांनी राजीनामा द्यावा या थरास जेव्हां गो. ष्ट आणली तेव्हांच दरबारांतील जुन्या कामदार लोकापैकी जाणत्या लोकांस असें वाटले की आतां मल्हारराव महाराज यांच्या राज्याचें आयुष्य संपलें. अगदीं मोडक- ळीस आलेल्या मंडपाचे आधारभूत स्तंभ काढून टाकून त्यास जास्त टिकाऊ कर- ण्याची इच्छा करणे अशा प्रकारचें हें मल्हारराव महाराज यांचे असमंजस कृत्य हो- तें. त्यांचा राजमंडप अगदी खिळखिळा जहाला होता. सर लुईस पेलीच्या पेना- च्या अग्राघातानें तो एका क्षणांत कोसळणार होता. अशा वेळेस महाराजांनी त्या- मंडपास कांहीं वेळपर्यंत टिकवून धरणाऱ्या स्तंभास काढून टाकिलें हैं त्या कामदारां- स अगदीं रुचलें नाहीं. असे असतां दादाभाई यांनी जुने दरबारी या सदराखाली सर्वांस एकमालिकेंत गोविलें यांत फार अविचार झाला आहे सारांश - सांगण्याचे तात्पर्य इतकेंच आहे कीं, दादाभाई यांनी महाराजांची दि. बाणगिरी केवळ राजहित करावें या बुद्धीने जरी पतकरली नवती तरी ती पतकरण्या- चा विशेष हेतु राजहिताचा होता; परंतु दुर्दैवाने अशा काही गोष्टी घडून आल्या धोक्यांत पडले आणि महाराज कीं बडोद्याचें राज्य ज्यास्त आणि कर्नल फेर यांजमध्ये इतकें वैमनस्य वाढले की त्याचा शेवट किती भयंकर झाला हैं सर्वांस माहित आहेच.