पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १८: कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. ०५० - - - विषप्रयोग कोणत्या रीतीनें केला त्याविषयीं कर्नल फेर यांची हकीगत - त्यासंबंधी त्यांनी केलेल्या रिपोटांतील तात्पर्य - सूटर साहेब यांचा सर लुईस पेली यांस रिपोर्ट - सर लुईस पेली यां- च्या रिपोर्टातील तात्पर्य • मल्हारराव महाराज यांस प्रतिबंध - 'आणि राज्याची जती - विषप्रयोगाची चौकशी करण्याकरितां कमिशनाची नेमणूक - कमिशनापुढे काम चालले त्या विषयी- ची संक्षिप्त हकीगत- सार्जंट बालंटाईनच्या भाषणाचें तात्पर्य- कमिशनांतील अधिकाऱ्यांचा भिन्न भिन्न अधिकार गवरनर जनरलचा शेवट ठराव - मल्हारराव महाराज यांच्या राज्य प - दाचा शेवट - मद्रास येथे त्यांचे प्रयाण णदोष विवेचन. - - या प्रकरणाबद्दल गु तारीख ९ नोवेंबर सन १८७४ रोजीं कर्नल फेर यांनी मुंबई सरकारास अशी तार पाठविली कीं, मला विष घालून मारण्याचा प्रयत्न करण्यांत आला होता; परंतु तो निष्फळ झाला. तारीख १७ नोवेंबर रोजी त्यांनी त्याबद्दल एक तपशीलवार रिपोर्ट केला असून त्याजबरोबर दुसरे कागद पाठविले आहेत. त्यात त्यांची स्वतःची हकीगत आहे, व्यावरून असे कळून येतें कीं, ते प्रातःकाळीं व्यायाम करून आले ह्मणजे त्यांच्या • चाकरांनी तयार करून ठेवलेले डाळिंबाचें सरबत नेहेमीं पीत असत. त्याप्रमाणें तारीख ९ नोवेंबर रोजी प्रातःकाळीं व्यायाम करून आल्यावर तयार करून ठेविले- ल्या सरबताचे दोन तीन घोट घेऊन ते लिहावयास बसले. सुमारें वीस मिनिटांन त्यांच्या पोटांत ढवळूं लागळें. तेव्हां त्यांस असे वाटले कीं, नासक्या डाळिंबांचें स रबत केल्यामुळे व्याजपासून मला असा विकार झाला. सबब त्यांनीं तें सरबत बा रीवाटें फेंकून दिलें. आणि कांचेचा प्याला टेबलावर ठेविला. इतक्यांत त्यांचें डो. के जड वाटून त्यांस घेरी आली. आणि सरबताच्या प्याल्याकडे पाहतात तो त्या- घ्या बुडाशीं काळ्या रंगाचें कांहीं गदळ त्यांच्या दृष्टीस पडलें. तें पाहून त्यांच्या मनांस मोठा डचका बसला. आणि सरबतांत विष कालविल्याची कल्पना तत्का. ● ळ त्यांच्या मनांत आली, व त्यांनीं डाक्टर सिवर्ड यांस बोलावून तो प्याला त्यांच्या • स्वाधीन केला. डाक्टर यांनी त्या काळ्या रंगाच्या गदळाचें मूळतत्व शोधितां, त्यां १