पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. गवरनर जनरलच्या सुचनेप्रमाणें मल्हारराव महाराज यांनी दिवाण आदी करू- न पांच कामदार याजपासून त्यांच्या हुद्याचे राजीनामें घेतल्यावर खानवेळकर आणि हरिबा गायकवाड यांजखेरीज बाकीच्या तीन कामदारांनी तर महाराजांची एकांती कधींही भेट घेतली नाहीं; इतकेंच नाही पण महारजांस सलाम करण्यासाठी त्यांनी जावें किंवा नाहीं अशी कर्नल फेर यांची सला विचारल्यावर त्यांनी रूकार दिल्यावरून फक्त दिवसांतून एक वेळा सलाम करण्यासाठी मात्र ते जात असत. सर- लुईस पेला आल्यावर मात्र त्यांच्या समक्ष गोष्ठी निघाल्यावरून एक दोन वेळां त्यांनी महाराजांस पुष्कळ मंडळी समक्ष विनय पूर्वक असे सुचविलें होतें कीं आतां महारा- जांनी सर्व राज्यभार दादाभाई यांजवर टाकून रेसिडेंटाबरोबर जितका कमी संबंध ठेववेल तितका ठेवावा. बडोद्याचा रेसिडेंट न्यायानें वागेल तर बडोद्याच्या राजकारभारामध्यें उत्तम रीतीचा सुधारणूक करून यश मिळविणे कांहीं दादाभाई व त्याचें सोबती यांस अशक्य नव्हते आणि सर लुईस पेली यांजकडून दादाभाई यांस योग्य रीतीची मदत मिळण्याची पूर्ण आशा होती. परंतु त्या राजास असे वाटलें कीं कर्नल फेर गेला आता दादाभाईची मला काय गरज आहे. ह्मणून ते सर्व व्यवहार सरलुईस पंछी यांजबरोबर स्वतः करूं लागले आणि दादाभाई यांस एका कारकुना प्रमाणे लेखूं लागले अर्थात दादाभाई यांस राजिनामा देणे भाग झाले आणि त्यांनी राजि नामा दिला म्हणून त्यांच्या सोबत्यांनी ही दिल. दादाभाई असे ह्मणतात की जुन्या कामदार लोकांच्या सल्याप्रमाणे सरलुईस पेढी आल्यावर महाराज वागू लागले. दादाभाई यांजवर गैरविश्वास ठेवून अथवा त्यास काढून देऊन स्वतः महाराजांनी सर लुईस पेली यांजबरोबर राज्यकीय व्यवहार सुरू ठेवावा असे जुन्या कामदार लोकांपैकी कोणी सला दिली असेल तर त्यांनी मोठा आवचार केला आणि या अपरधाबद्दल जिव्हाछेदनाचें त्यास शासन केलें तरी तें उग्र ह्मणवणार नाहीं, परंतु या गोष्टीच्या खरेपणास काय ते प्रमाण दादाभाई- चें झणणे. राजानें आपणास पन्नास हजार रुपये दिले आणि कर्नल फेर यांची जबर हरकत असतां ती न जुमानून आपणास बडोद्याचा दिवाण बनवि त्यांस प्रत्यक्षपणे वाईट ह्मणण्याची दादाभाई यांस लाज वाटली असेल ह्मणून ते अन्योक्तीनें जुन्या कामदार लोकांचें मवें साधन घेऊन राज्याविषयीं जे कांहीं बोढण्याचें तें बोलतात असे दिसतें. दादाभाईचा असा आग्रह होता कीं जुन्या कामदार लोकांस महाराजांनी बडोद्या- च्या बाहेर हाकून द्यावें. असे जर झालें असतें तर कांहीं वाईट नव्हतें. ते बिचारे दोषनिर्मुक्त झाल असत; परंतु या संबंधानें खालीं लिहिलेली नोष्ट ध्यानांत ठेवण्या जोगी आहे. मोठे सयाजीराव महाराज यांचे कारकिर्दीत बडोद्याच्या रेसिडेंटानें असा आ ग्रह धरला होता की महाराजांच्या भोवतालचे कांहीं लोक काढून द्यावें याजबद्दल सर माउंट स्टुआर्ट एलफॉनस्टन साहेब मुंबईचे माजी गवरनर यांनी फार सुंदर