पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दादाभाई नवरोजी. ( १५९) योगाने सुरक्षित राहील असे कृत्य करतानां बापुभाई व गोविंदराव मामा यांनी आ पला स्वार्थ पाहिला तर त्याबद्दल त्यांस कोणी कां दोष द्यावा ? महाराजांची दिवा- णगिरी पतकरण्यांत दादाभाई यांस कांहींच अर्थलाभ नव्हतां काय ? त्यांनी आप ला स्वार्थ बुडवून केवळ महाराजांच्या हितासाठीं ती पतकरली होती काय ? जुन्या कामदार लोकांस बडोद्याहून काढून दिल्यानें मल्हारराव महाराज अगदीं आपल्या तंत्राने वागतील असे दादाभाई यांस वाटत होतें ही मोठी चूक होती. ना. नासाहेब खानवेलकर आणि दामोदरपंत नेने यांस काय वाटले असेल ते असो, परंतु मल्हारराव महाराज यांनी पूर्वी प्रमाणेच वर्तन केलें तर त्यांचे राज्य बुडेल हैं दरबारांतील मुत्सदी लोकांस समजत नव्हते की काय ? गवरनर जनरल यांनी म ल्हारराव महाराजांच्या कारकीची मर्यादा देखील करून टाकिली होती असे अ सतां मल्हारराव महाराज यांस जुन्या कामदारांनी जुन्या मार्गाला अनुसरण्याविषयी सला दिली असे दादाभाईचें ह्मणणे आहे तें अगदीं अविवेकजन्य आहे. महाराजांची दादाभाई यांजवर मुळींच भक्ती नव्हती. एकाचे दोन शत्रु परस्पर मित्र होतात तशा प्रकारचा महाराज यांचा व दादाभाईचा संबंध होता. महाराजांस असे वाटत असे की कर्नल फेर यांस रेसिडेंसीवरून काढण्याच्या प्रयत्नांत दादा. भाई सफळ झाले तर दादाभाई यांस काढून देऊन आपण मोकळे होऊं आणि दादाभाईचा प्रयत्न निष्फळ झाला तर कर्नल फेर यांस आपण मिळून जाऊन दा- दाभाईस रजा देऊं असे त्या अविचारी राजाचे मनोगतधर्म होते. दादाभाई यांजम- ध्ये राज्यकारभार चालविण्याचे ज्ञान नाही आणि मी त्यापासून सुटका करून घे. ण्यास इच्छित आहे असे महाराजांचें ह्मणणे कर्नल फेर यांनी मुंबईसरकारास क ळविले होते ते खोटें होतें काय ? महाराजांचा हा तर चालु क्रम होता कीं दोबा. मध्यें जितकी लावाळावी करवेल तितकी करावी आणि ह्मणूनच कर्नल फेर यांनी दादाभाईच्या संबंधाने कांहीं वाईट उच्चार काढले की त्याजमध्ये पदरचे दोन शब्द जोडून मल्हारराव महाराज दादाभाई यांस तो मजकूर सांगवित असत. असें कर ण्याचे त्याचें हृद्गत एवढंच होतें कीं दोघांमध्ये अतिशय कलह माजवून * सुंदोपसं_ द देत्याप्रमाणे दोघांचें ही निकंदन करावें. हें महाराजांचें स्वतःचे शाहणपण होते आणि अशा प्रकारच्या दुष्ट विचाराची महाराज यांजमध्ये कोठें उणिव होती, कीं त्याबद्दल जुन्या कामदार मंडळीनीं त्यांस सला द्यावी?

  • भागवतात अशी कथा आहे की सुंद आणि उपसुंद नावाचे दोन बंधु होते, त्यास

ब्रह्मदेवाचा असा वर होता की तुमचा मृत्यु परस्पर | च्या हृांतूच होईल. दुसरा कोणी तुझास मारून टाकू शकणार नाही. या बंधूंमध्यें पराकाष्ठेचें मित्रत्व होते आणि त्यांनी जगति पराकाष्टे- चा अनर्थ उडविला तेव्हा सर्वानों विष्णूची प्रार्थना केली. विष्णूनें सुंदर स्त्रीचें रूप धारण करू न त्यांच्या पुढे येऊन उभे राहिले. तें मनोरम रूप पाहून दोघासही ही आपल्यास स्त्री असार्व अशी इच्छा झाली आणि युद्धास लागले आणि परस्पररांच्या गदाघातें दोघेही प्राणास मुकून जा गाची पीडा टळली,