पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. पण आहे. ही रकम आपल्या स्वतःसाठी घेण्यास दादाभाई कबूल नव्हते हे खरें आहे याबद्दल महाराजांस ज्यांनी सला दिली त्यांस अपराधावांचन दादाभाई यां नीं आपले प्रतिस्पर्धी मानावे यांत त्यांजकडे अतिशय अकृतज्ञपणा येतो. सन १८७३ च्या डिसेंबर महिन्यांत विलायतेहून दादाभाई यास बोलावून आणण्याविषयीं महारा- जांस कामदार लोकांनींच अग्रहपूर्वक विनंती केली होती, दादाभाईविषयींच का- य पण कर्नल फेर यांच्या शिफारसी प्रमाणे भाऊ रेवडकर यांस दिवाण नेमून आह्मां सर्वांस रजा द्यावी असे देखील अंतःकरण पूर्वक मल्हारराव महाराजास त्यांनीं सां- गितलें होतें, कारण महाराजांचें राज्य कोणीकडून तरी सुरक्षित रहावें हा त्यांचा मु ख्य हेतु होता व त्यांतच त्यांचें हित होतें. जेणेकरून त्याचें राज्य लयास जाईल अशी वाईट मसलत त्यांस देण्यांत त्यांचा काय फायदा होता ? याविषयी विचार के- ला असतां प्रत्येक मनुष्यास सहज असें वाटणार आहे की, आपण दरबारांतील स र्व लोकांस एकंदरीने बद सलागार असी संज्ञा देतो हा आपला अगदीं अविचार आहे. रोसडेंटाच्या मर्जीप्रमाणें चालल्यानेंच महाराचांचें राज्य चीरस्थापी होणार होतें. कर्नल फेर यांजमध्ये दुसरे गुण कसे ही असोत, एखाद्याचा अभिमान धरणें हा त्यांजमध्ये विलक्षण गुण होता. मल्हारराव महाराज जर त्यांच्या मताप्रमाणे वाग ले असते तर ते जसे त्यांच्या प्रजेसाठी त्यांजबरोबर भांडले तसे त्यांच्या साठी आपल्या सरकाराबरोबर मांडले असते आणि मल्हारराव महाराज यांचे राज्य ब- ळकट केलें असतें. दादाभाई आणि त्यांचें सोबती यांस ही गोष्ट चांगली स्मरत असेल की, ज्या दिवशीं गवरनर जनरलचा खलिता महाराजांस रोसडेंटांनीं प्रविष्ट केला त्या रात्रीं जुन्या कामदार मंडळींनी महाराजांस काय सला दिली आणि आपण काय दिली. जुन्या कामदार मंडळींनीं असे सांगितलें कीं, कर्नल फेर यांस गवरनर जनरल यांनीं बदलले नाही ही गोष्ट फार वाईट केली. यास्तव आतां कर्नल फेरच्या तंत्राने महाराजांनीं वागून आपढ़ें राज्य धोक्यांत न पडेल असे करावे. राज्यांत महाराजांनी किती जरी सुधारणूक केली तरी तिला सुधारणूक ह्मणणें हें कर्न- ल फेरच्या आधिन राहिले आहे यासाठी त्यांसच शरण जाऊन ते सांगतील तसे बागले पाहिजे. दादाभाई यांस ही मसलत सर्वोपरी अमान्य झाली नाहीं तरी म हाराजांनी सन्मार्गानुसरण केळे असतां कर्नल फेर यांचें भय बाळगण्याचे काह कारण नाहीं असे सांगितलें. राजकीय कामांत वहिवाटलेल्या मनुष्यास या दोनी स- ले मध्ये वास्तविक सला कोणती होती हैं सहज समजण्यासारखे आहे. कर्नल फेर यांच्या प्रातिकुल्यामुळे दादाभाई यांची राज्यकारभार चालविण्याची अक्षमता कर्नल फेर यांच्या मनाचा झोक आणि दादाभाईविषयीं त्यांचे बद्धमूळ हडवैर पाहून राष्ट्राच्या हितासाठी जुन्या कामदार लोकांपैकी कोणी दादाभाई यांस काढून देऊन कर्नल फेर यांस आवडेल त्यांस दिवाण नेमण्याविषयीं महारजांस सला दिली असे- ल किंवा तशी गोष्ठ आपोआप घडून आणण्यासाठी कांहीं कारस्थान केले असेल तर यांत त्या कामदारांनी वाईट तरी काय केले? मल्हरराव महाराज यांचे राज्य ज्या