पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दादाभाई नवरोजी. (१५७) रेसिडेंटाच्या हुद्यावरून काढले असे दादाभाई यांस व दुसऱ्या कोणास वाटळें अ ल तर ती त्यांची मोठी चूक होय. गवरनर जनरल यांस तर कमिशन नेमण्यापूर्वी देखील कर्नल फेर यांच्या लायकीविषयी संशय उत्पन्न झाला होता. कर्नल फेर यांनीं रेसिडेंटाचा च्यार्ज घेतल्यापासून बडोद्याच्या दरबाराशीं जें वर्तन केले होते आणि मुंबई सरकारास रिपोर्ट केले होते त्या प्रत्येक गोष्टीकडेस जर मुंबईसरकारांनी लक्ष दिले असतें तर कर्नल फेर रेसिडेंटाचे हुद्यास लायक नाहीत असे प्रमाण प्रत्येक प्रकरणांत सापडले असते; आणि गवरनर जनरल यांचा कमिशनच्या रिपोटॉवर ठराव झाल्यानंतर त्यांचें वर्तन इतकें अविचाराचें होतें कीं, ते कागदपत्र मात्र गवरनर ज- नरळच्या समोर गेले पाहिजे होते; म्हणजे कर्नल फेरच्या कारकिर्दीचें आयुष्य संप- णार होतेंच. मुंबई सरकारचा कर्नल फेरविषयीं जबर पक्षपात असतांही त्यांच्या नें देखील असें ह्मणवले नाहीं, कीं कर्नल फेर रेसिडेंटीच्या हुद्यास लायक होते. त्यांचें काय तें झणणे एवढेच होते की ज्या वेळेस आणि ज्या रीतीनें कर्नल फेर यांस का ढण्यात येतें ती रीत आणि वेळ आह्मांस संमत नाहीं. दादाभाई यांनी जुन्या कामदार लोकांविषयी आपण छापलेल्या बुकांत केवळ कर्नल फेर यांचें अनुकरण केले आहे. त्यांच्या मोठेपणास तें कसे शोभत असेल तें असो. पण या संबंधाने त्यांचे विचार अगदीं अप्रबुद्धपणाचे आहेत. गवरनर ज नरळचा खलिता पावल्यानंतर जुन्या कामदारांनी महाराजांस पूर्वीप्रमाणे आचरण क रण्याविषयीं सला दिली असें दादाभाईचें ह्मणणे अतिशय असमंजसपणाचें आहे. मल्हारराव महाराज यांच्या प्रधानमंडळीमध्ये जे जाणते होते त्या सर्वांचा दादाभाई- च्या संबंधाने एक विचार होता. त्यांचा दिवाणगिरीचा अधिकार निर्विघ्न चालावा आणि महाराजांनी त्यांच्या तंत्राने वागावें असे ते मनापासून इच्छित होते. लार्ड नार्थब्रूक यांच्या दरबारास जाण्याविषयीं महाराजांनी हरकत घेतली तेव्हां दादाभा- ईची सला घेण्याविषयीं त्याच कामदारांनी महाराजांस सला देऊन दादाभाई यांस बडोद्यास बोलाविलें. त्यांनी ही गोष्ट स्मरणांत ठेविली पाहिजे की आपणच प्रथमतः महा- राज यांस व्हाइसराय साहेबांच्या दरबारास गेले पाहिजे अशी सला देऊन व्हाइसराय यांस वाईट न वाटेल अशी आपल्यास तोड सूचत नाहीं असें निक्षून सांगितलें असतां नंतर महाराजांची मर्जी खुष ठेविण्यासाठीं एक युक्ती योजून मुंबई सरकारास एक तार पाठविली, आणि ज्यांनी दादाभाईच्या दृढनिश्चयाविषयीं व योग्य सल्ले देण्याविषय महाराजांजवळ त्यांच्या परोक्ष त्यांची प्रशंसा केली होती त्यांस खालीं पहावयास लाविलें. दादाभाई यांनी काय तो महाराजांस मानमर्तबाच्या संबंधानें खळिता लिहून दिला होता तो फारच उत्तम लिहिला होता यांत कांहीं संशय नाहीं, पण त्यांजबद्दल दादाभाई यांस महाराजांनीं पंन्नास हजार रुपये दिले पाहिजे होते की काय याचा कोणी ही विचार केला असतां इतकी मोठी रक्कम बक्षीस देण्यासारखी दादाभाई- नीं कांहीं महाराजांची चाकरी बजाविली नव्हती असें सहज कळून येण्यासारखें