पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. करून देशी राज्याच्या दिवाणाने यश मिळावल्याचें एकही उदाहरण आम- ·च्या तर माहितींत नाहीं; मग दादाभाई यांस काय माहित असेल तें असो. परं- तु त्याहून अशीं पुष्कळ प्रमाणे आह्मांस ठाउक आहेत कीं, सामान्य अकलेच्या म नुष्यांस रेसिडेंटांनी मोठे राज्यकर्ते करून सोडलें आणि ज्यांचा त्यानीं द्वेष केला ते मोठे शाहणे असतांही त्यांस अगदीं मूर्ख, लबाड, लाचखाऊ, आणि बदसलागार बनवून देशोधडी लाविलें. सरकारचें वर्तन बहुतकरून रेसिडेंटाच्या धोरणावर असतें. दादाभाई यांनी ही गोष्ट अवश्य लक्षात ठेविली पाहिजे होती कीं, लक्ष्मीबाईसा- हेब यांच्या लग्नामध्ये कर्नल फेर यांनी जें असभ्य वर्तन केले होतें, त्याबद्दल त्यांनी महाराजांस जो खलिता तयार करून दिला होता त्यांत अशी सूचना केली होती कीं, सरकारांनी कर्नल फेर यांस रेसिडेंटाच्या हुद्यावर ठेवणें वाजवी नाहीं. कर्नल फेरसारख्या स्वभावाच्या मनुष्यास विसर पडावा असा कांहीं हा सामान्य अपकार दा- दाभाई यांजकडून झाला नव्हता. त्यांनी लिहिलेला खलिता सर्वांस मान्य झाला हो- ता ही गोष्ठ खरी आहे; परंतु त्यांचें पाठबळ नसतें तर रेसिडेंटाशी उघड द्वेष क रण्याविषयीं जुन्या कामदारांनी महाराजास कधींही मसलत दिली नसती व त्यांचे धैर्य देखील झार्ले नसतें, आठवड्यांतून दोन वेळां महाराज रेसिडेंटाच्या मेटीस जात असत त्याप्रमाणें आतां त्यांनीं जाऊं नये ह्मणून सदरहू खलिता लिहिल्यानंतर दादाभाई यांनी महाराजांस सला दिली होती ती कोठें शहाणपणाची होती ? सांगण्याचें तात्पर्य एवढेंच आहे कीं तक्षकाच्या शेपटावर पाय देऊन जसा अपकार करावयाचा तसा अगोदर दादाभाई यांनी कर्नल फेर यांस अपाय केला होता आणि त्याबद्दल प्रतिकार करण्यासाठी कर्नल फेर यानीं नंतर यत्न केला. कर्नल फेर अतिशय उतावळ्या स्वभावाचा रेसिडेंट होता, त्यास आपले वजन दरबारावर कसे ठेवावे हें मुळींच समजत नव्हतें; नानासाहेब यांच्या प्रतिनिधीपणास आणि दादाभाईच्या दिवाणगिरीस हरकती घेऊन व बड्या बड्या बाता झोकून त्या- नीं दरबारांमध्ये आपल्यास अगदी हलकें पाडून घेतलें होतें; नाहीं तर दादाभाईसा- रख्या भोळ्या मनुष्यास डघड रीतीनें कांहीं एक द्वेषभाव न दाखवितां दिवाणगिरीव- रून काढून टाकणे ते येवढे काय कठीण होतें? एखादा शहाणा साहेब असता तर त्यानें आपले आंग न दाखवितां त्यास महाराजांकडूनच दूर करविलें असतें. महा- राजांस दादाभाईचा असा कोठें पक्षपात होता की त्याच्यासाठी महाराज आग्रह ध रून बसले असते, त्यांच्या मर्जीप्रमाणे एक दोन कामाचे दादाभाईच्या परोक्ष कर्नल फेर यानीं उलगडे करून महाराजांस आपण पूर्णपणे अनुकूल आहोत असें प्रत्ययास आणून दिलें असतें म्हणजे महाराजानीं दादाभाई यांस तेव्हांच वाटाण्याच्या अक्ष- ता दिल्या असत्या. परंतु कर्नल फेर याजमध्यें ही हें चातुर्य नव्हते त्यास कोणी का- य करावें ? दादादाई यानीं खलिता लिहिल्यावरून गवरनर जनरल यांनी कर्नल फेर यांस-