पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दादाभाई नवरोजी. (१५५) यांजवर मुकदमा चालविणें वाजवी वाटून त्यांजवर दादाभाई यांनी वारंट काढिलें असता शेवटीं कां बरें ती गोष्ट आपल्याकडेस हार घेऊन सोडून द्यावी लागली . रेसिडेंटांनी दसऱ्याच्या स्वारीस लष्करी मान देण्यासाठीं जाऊं नये असा देखील हुकूम आणून ठेविला होता आणि त्या संबंधानें गायकवाडाचें काय ह्मणणें होतें याविषयीं मुंबई सरकारांनी दादाभाई यांस विचारले तरी होते काय ? गायकवाडांनी इंग्रज सरकारच्या रयतेवर जुलूम केला नसता व त्यांजबरोबर केलेल्या कौल कराराला ति- ळमात व्यंग आणिला नसतां रेसिडेंटांनी खोट्या खोट्या गोष्टी मनांत भरवून. कमिशन नेमण्याविषयीं गवरनर जनरल यांचें मन वळविलें या प्रसंगी त्या संबंधाचे मल्हारराव महाराजांचें सद्वर्तन कां बरें उपयोगास आलें नाहीं ? मल्हारराव महाराज यांच्या कृत्यांत ज्यास त्यांच्या पूर्वजाच्या कृत्यांचं साधर्म्य नाहीं असें एक देखील कृ त्य नव्हतें. मग त्यांच्या पूर्वजांच्या काराकेदर्दीत रेसिडेंट यांनी लोकांच्या फिर्यादी ऐ- किल्या नाहीत आणि त्यांच्या कारकिर्दीतच कर्नल फेर कां बरें फिर्याद ऐकू लाग ले ? गायकवाडांबरोबर असा कवीं नवा तहनामा झाला होता की त्या अन्वयें रे.. सिडेंटास गायकवाडावर फिर्यादी ऐकिण्यास अधिकार प्रात्प झाला होता? नव्या त हा विषयीं राहूं द्या, मुंबई सरकारांनी कर्नल फेर यांस असा हुकूम देखील दिला नव्हता की, त्यांनी बडोद्याच्या लोकांच्या फिर्यादी ऐकाव्या. कर्नल फेर यांस जें उचि त वाटले ते त्यांच्या सरकारास अगदीं पसंत झालें. राजकीय खात्यांत काय काय कारस्थानें होतात, सत्याचें असत्य आणि असल्या- चें सत्य कसें होतें, न्यायाला अन्यायाचें आणि अन्यायाला न्यायाचें कसें रूप देतां येतें आणि देशीं राज्याचीं राज्ये बुडविणे अथवा त्यांजमध्ये किती जरी अव्यवस्थित स्थिती असली तरी त्यांजवर पांघरूण घालून ती सुरक्षित ठेवणें हें रेसिडेंटाला किती सुलभ आहे याविषयीं खरोखर दादाभाई यांस अनुभव तर नव्हताच, पण ह्या गोष्टी जशा काय त्यांनी ऐकिल्या अगर चल्या देखील नवत्या असें त्यांस दिवाणगिरी- पतकरतांना भुरळ पडले होते असे झटल्यावांचून राहवत नाहीं. दादाभाई यांनीं छापलेल्या बुकांत व्याजोक्तीनें आपलें व आपल्या सोबत्याच्या गुणाचें वर्णन केले आहे, या बुकाचे दहाव्या पानांत त्यांचें ह्मणणे असें आहे कीं, साहेब यांस खुशी ठेवण्याकरितां जर आम्ही अलौकिक गुण प्रदर्शित केले असते तर सर्व हिंदुस्थानांत आम्ही मोठे राज्यकर्ते आणि सुधारणूक करणारे बनलो असतो; परंतु दुर्दैवाने आह्मा. स विद्यालयांत एकदोन वाईट घडे शिकावले आहेत ते असे की, प्रत्येक प्रकरणांत आम्ही दोन्ही पक्षाकडेस लक्ष द्यावें आणि आमचे कर्तव्य काम बजवावें. यामुळे खरोखर आम्ही त्या दुष्ट शिक्षणाचा परिणाम भोगलाच पाहिजे, कर्नल फेर यास जें आवडतें होते त्याच्याशीं आमचें समानत्व आणि योग्यैकत्व कोठून असणार ? आम- च्या मतें तर ही व्याजोक्ती नाहीं, अगदीं सत्योक्ती आहे. रोसडेंटाचें मनरंजन करून का रभार करण्याचा गुण दादाभाईमध्यें नव्हता, ही त्यांजमध्ये मोठी उणीव होती आणि त्या योगानें बडोद्याचा राज्यकारभार चालविण्यास रेसिडेंटाबरोबर द्वेष