पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. द्या ह्मणून राजास कधींही सला देऊं नये. गणपतराव महाराज यांचे कारकिर्दीत भाऊ तांबेकर यांस कारभारावरून काढण्याविषयीं इंग्रजसरकारचें सांगणे झाले ते- व्हां महाराजांचे मनांत असे आलें होतें कीं तांबेकर यांजकडून तसा काही अपराध झाला नाही की त्याजला काढून देण्याविषयी इंग्रज सरकारांनी मला भाग पाडावें. ह्मणून त्यांनी त्याबद्दल तक्रार घेण्याचा निश्चय केला; परंतु तांबेकर यांनी त्यांस अशी वि नंती केली की, असे करण्यांत कदाचित् महाराजांस कांहीं जोखम लागेल यासाठीं माझ्या एका व्यक्ती करितां महाराजांनी आपल्यास संकटांत पाडून घेऊं नये हें तां- बेकराचें कृत्य कोण स्तुत्य ह्मणणार नाहीं; परंतु दादाभाईनीं तर महाराजांस आप- ल्यास दिवाणगिरी देण्याविषयी उलटें उत्तेजन दिले होतें. " त्यांनी छापलेल्या बुकांतच लिहिले आहे की, “आम्ही महाराजांस पुन्हां सांगितलें कीं, कर्नल खरोखर आह्मांस पराकाष्ठेचा प्रतिकूळ आहे. आणि आह्मांस जरी असे वाटतें कीं, जर तुझी सुधारणूक करण्याविषयीं दिलेली वचनें पाळण्यास मना- 'पासून इच्छित असाल आणि तुमच्या कृत्यानें तुझी असे अनुभवास आणून द्याल कीं ती गोष्ट तुमचे मनांत खरोखर आहे तर तुझास ब्रिटिश सरकाराकडून आणि त्यांत विशेषकरून हल्लींच्या गवरनर जनरलाकडून काहीं अपकार व्हावयाचा नाहीं कारण की, त्यांनी तुमच्या संबंधानें न्यायानें वर्तणूक केली आहे, तथापि आह्मी अ- शी इच्छा करितों कीं, मी दिवाणगिरीचें काम चालवावे किंवा नाहीं यांजविषर्यं महाराजांनी अजून पुरता विचार करावा.' या सांगण्यांत दादाभाई यांनी आपला निस्पृहपणा दाखविला होता आणि तसा त्यांनी पुष्कळ वेळा दाखविला. वारंवार ते राजीनामा देण्यास तयार होत असत आणि महाराज त्यांची समजूत करून पु म्हां कामावर आणित असत. परंतु महाराजांचा दृढनिश्चय असेल तर कर्नल फेर किती जरी प्रतिकूळ असला तरी त्याची मला परवा ना- हीं; मी दिवाणगिरीचे काम करण्यास सिद्ध आहे असें महाराजांस उत्तेजन देऊन आपल्या साठी राज्य धोक्यांत टाकणे हें दादाभाई यांस उचित नव्हते. आणि ते काम सोडून गेले असते आणि महाराज कर्नल फेर यांच्या तंत्राने वाग ले असते तर काहीं महाराजांचें राज्य बुडालें नसतें, पण उलटें जास्त टिकाऊ झा लें असतें. रेसिडेंट किती जरी प्रतिकूळ असला तरी महाराज जर नीतीनें वागतील तर यांस कांहीं धोका लागणार नाहीं असें दादाभाईस वाटत होते यांत त्यांची मोठी चूक होती. रेसिडेंट पराकाष्ठेचा द्वेष्टा असतां त्याची परवा न बाळगण्यास जें नी- त्यनुसरण झालें पाहिजे होते तें मुळींच मल्हारराव महाराज यांच्यानें होण्यासारखें न- व्हतें आणि नीतीला अनीतीचें आणि अनीतीला नीतीचे स्वरूप देणें हें कर्नल फेर यांच्या आधीन होतें. लक्ष्मी बाईचें लग्नांत कर्नल फेर यांनीं अगदीं अप्रयोजक प णा केला होताच. मग कां बरें त्याबद्दल त्यांस त्यांच्या सरकारांनी ठपका दिला ना- हो ? आणि त्यांचें वर्तन गवरनर जनरल त्यांस देखील पसंत झाले ! चंद्रराव कडू