पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दादाभाई नवरोजी. ( १५३) वाणगिरी पतकरण्या विषयी उत्तेजन दिळें नव्हते. त्यास अनुभव नाही ही त्यांनी शंका घेतली होतीच व दादाभाई यांनी देखील तो आपला न्यूनपणा कबूल केला होता. सर फिलिप उडहौस यांनीं तारीख ५ मार्च सन १८७४ रोजी हिंदुस्थान सरकारास पत्र लिहिलें त्यांत "इंग्लंडांतील पुष्कळ लोकाचें दादाभाई विषयीं चांग ळें मत आहे " असे शब्द लिहिले आहेत एवढ्यवरच दादाभाई यांनी आपण दि. वाणगिरी करण्यास योग्य आहोत असें मानलें होतें; परंतु त्यांच्याविषयीं लोकांचें जें चांगलें मत आहे तें कांहीं एक राज्यकर्ते पुरुष आहेत म्हणून नाहीं. त्यांच्या इतर गुणाविषयीं लोकांचे तें मत आहे आणि ते अगदीं निरपवाद आहे; पण त्या मताचा दादाभाई दिवाणगिरी करण्यास योग्य आहेत किंवा नाहींत या प्रश्नाश संबंध काय ? दुसरी एक गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे आणि त्यावरून स्पष्ट असे कळून येतें कीं सर फिलिप उडहौस यांची दादाभाई यांस तिळमात्र देखील अनुकूलता नव्हती. ज्या पत्तांत दादाभाईविषयीं त्यांनीं वर लिहिल्या प्रमाणें लिहिले आहे त्याच पत्राच्या अकरावें कलनांत तें इंडिया सरकारांजवळ अशी परवानगी मागतात की, त्यांनी आपणास असा अधिकार द्यावा कीं, योग्य मनुष्य दिवाणगिरीवर नेमण्याविषयीं गायकवाडास आह्मी शिफारस करावी. यावरून उघड होतें कीं, जर इंडिया सरकारांनी मुंबई सरकारांस त्यांच्या ह्मणण्याप्रमाणे परवानगी दिली असती तर त्यांनीं कांहीं दादाभाई यांस दिवाणगिरीच्या अधिकारावर नेमण्यावि. षयीं गायकवाडास सांगितलें नसते. मल्हारराव महाराज यांनी दादाभाई यांसच दिवाण नेमण्याविषयीं सन १८७४ च्या अगष्ट महिन्यांत निश्चय केला त्या वेळेस देखील सर फिलिप उडहौस यांनीं रेसिडेंटच्या द्वारे महाराजांस असे कळविलें कीं, दादाभाईच्या लायकी विषयीं मुंबई सरकार आपला कांहीं एक अभिप्राय न देतां त्यांस जर महाराज दिवाण नेमीत असतील तर त्यांत हरकत करण्यास इच्छित ना- होत. इंडिया सरकारांनी मल्हारराव महाराज यांस दिवाण नेमण्याविषयीं स्वतंत्र अधिकार दिला होता सबब मुंबई सरकारास दादाभाईविषयीं वर लिहिल्याप्रमाणे लिहिण्याचीच मुळीं गरज नव्हती. असे असता त्यांनी ज्या पेक्षां तसें लिहिलें त्याव रून दादाभाई दिवाणगिरीस लायक नाहींत असें जे त्यांच्या मनांत होते तें मुद्दाम गायकवाडास जाणवावयाकरितांच त्यांनी तसे लिहिलें असे ध्वनित होत नाहीं काय ? कर्नल फेर यांनी महाराजांस उघडपणे सांगून पाठविलें होतें कीं तुझी जर दा दाभाई यास दिवाण नेमाल तर तुमच्या आणि माझ्यामध्यें लढाई सुरू होईल आणि तिचा शेवट परिणाम असा होईल कीं तीन महिन्यांत महाराजांचें नुकसान होईल. देशी राजाच्या दरबारामध्यें ब्रिटिशसरकारच्या रेसिडेंटाचें किती वजन असतें हें ज्यास चांगळे माहित आहे तो सहज कबूल करील कीं, रोसडेंटास इतका ज्या मनुष्याचा तिटकरा आलेला आहे व ज्याच्या योगानें राजास अपाय होईल असे रेसिडेंटानें उघड भय घातले आहे त्या मनुष्यानें दिवाणगिरीची आपल्यास वस्त्र १७