पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ष्टिलेले असतांही त्यांच्या पुरातन विचारांत कांहीं देखील फेरबदल झाली नव्हती. मी जें इच्छीन तेंच व्हावें. मग तें सुक्त असो, अगर असुक्त असो, हा असद्विचार त्यांच्या मनांत अगदर्दी खिळलेला होता तो होताच; व त्यांचेविषयीं दादाभाई यांस कांहीं अज्ञान नव्हतें आणि कदाचित् असेल तर तो तरी त्यांच्या भोळ्या स्वभावा- चा दोष होय. धूर्त मनुष्याला महाराज कोणत्या स्वभावाचे होते हैं कळण्यास अ गढ़ी थोड्या दिवसांचा सहवास पुरे होता. आणि त्यांस तर आठ महिने महाराजां- चा समागम झाला होता. आणि आरंभी त्यांस महाराजांनीं दस्ताऐवज लिहून दिले. ला पांच पळांत परत घेऊन फाडून टाकिला होता आणि तोंडानें दिलेल्या वचना पैकी एक देखील पाळले नव्हते. अशा प्रकारचे त्यांस अनेक अनुभव आले असतां त्यांनी महाराजांची दिवाणगिरी पतकरळी यांत त्यांनी काय विचार केला असेल तो असा. त्याचे हे कृत्य सुज्ञ जनांला केवळ साहस वाटलें. मल्हारराव महाराजांची दिवाणगिरी पतकरण्यांत आपण अविचार केला हें शाबित करण्याकरितांच जशी काय त्यांनी सर बार्टल फ्रियरची पत्रे आपण छापलेल्या बुकांत शेवटीं छापिल आहेत. त्यांत तारीख ७ नोवेंबर सन १८७३ चे पत्र आहे, त्यांत सर बार्टल फ्रियर यांनी दादाभाई यांस असे लिहिले आहे की, तुझाला जाते सनयीं मी जो उपदेश केळा त्याची पुनरावृत्ती मी करूं शकेन. गायकवाडांनी जर मुंबईसरकारास डावळण्याचा प्रयत्न केला तर स्टेट सेक्रेटरी यांनी मुंबईसरकारचाच पक्ष घेतला पाहिजे. त्या वेळेस तुझी जर मल्हारराव महाराजा सारख्या दुर्बळ, अनिर्वाच्य, आणि दुराचरणी राजाचे संरक्षण करण्यास जाळ तर तुम्ही आपल्यास धोक्यात पाडून घ्याल. गाय- कवाड यांस तुमची सला घेण्याविषयी मोकळीक मिळत नाहीं, हो मोठी दुःखाची गोष्ट आहे. तुमच्या सारखा चांगली सला देणारा दुसरा कोणी त्यास मिळणार नाहीं; परंतु मला वाटतें कीं, इग्लंडांतील बारिण्टर जरी मल्हारराव यांस मसलत देण्यास योजिले तरी त्याच्याने देखील मल्हारराव यांच्या च्या वाईट आचरणापासून त्यांचे संरक्षण करूं शकवणार नाहीं. तथापि तुमचा प्रयत्न करण्याचा इरादा असेल तर ली वारनरच्या द्वारें मुंबईच्या गव्हरनरास भेटून त्यांजबरोबर विचार करा. त्यांनीं जर नाकबूल केलें तर तुम्ही करणे सोडून द्या. आपल्या लाकांपेक्षां युरोपियन लोक किती हो शहाणे! सर बार्टल फ्रियर यांस मल्हारराव यांचे स्वतःचे गुण त्याज बराबर सहवास नसता जसे बरोबर कळले होते तसे दादाभाई यांस आठ महिनें सहवास घडून कळलेनाहींत!! सर बार्टल फ्रियर सारख्या दूरदर्शी राजनयज्ञाने दादाभाई यांस मल्हारराव महाराज यांची दिवाणगिरी न पतकरण्याविषयीं सला दिली असता त्यानीं तो ऐकिली नाही ह्या अविचारापासून जीं कटू फळे त्यांस प्राप्त झाली त्याबदल त्यानीं दरबारच्या जुन्या कामदारांस लोकांस दोष द्यावे आणि आपल्या चुका आपण मनांत आ. णूं नये हे त्यांच्या योग्यतेस शोभत नाहीं. त्यांच्या सारख्या मनुष्यानें अगोदर आपल्या चुकां पदरांत घेऊन मग दुसऱ्याच्या चुका काढित बसावें. सर बार्दल फ्रेयरच्या सल्या- प्रमाणें दादाभाई यांनी मुंबईच्या गव्हरनराची भेट घेतल्यावर त्यांनी देखील त्यांस दि-