पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दादाभाई नवरोजी. (१५१) सर्वांस अशी दिसली की, महाराजांनी जसा काय त्या सत्पुरुषावर एक मोठा अनु ग्रह केला; अशा रीतीनें दादाभाई यानीं त्यावेळेस आपके आत्मसंयमन करून वेळ- मारून नेली. महाराजानीं सोन्याच्या तोफा केल्या होत्या त्यासाठीं सोने खरेदी करण्याकरितां तिजोरीवर एक मोठ्या रकमेबद्दल चिठी लिहिली होती. ती फडनवीसाच्या कारकुनाने दादाभाईची सही घेण्यासाठी नेली. त्यांनी सांगितलें कीं, आपल्या जामदार खान्यांत पैसा नाहीं अशी रेसिडेंट यांस सबब सांगून सरदार बगैरे लोकाचे आपण पगार दत नाहीं, आणि इकडे असा अव्यवस्थितपर्णे खर्च करतों हैं चांगलें नाहीं, यासाठी मी या चिठीवर सही कारत नाहीं. हा मजकूर का रकुनाने महाराजांस सांगितला. तेव्हां त्यांस पराकाष्ठेचा राग आला, आणि त्यांच्या सहीची परवा न करितां आपण त्या चिठीवर सही करून दिली. सन १८७१ चे सालांत उष्ण काळांत महाराज नवसरीस गेले होते आणि दादाभाई बडोद्यांत कारभार पहात होते. त्यांनी आपल्यास कामदार लोकांच्या नेम णुका करण्यासाठी अमुक एक यत्तेपर्यंत खर्च करण्याची परवानगी मिळावा ह्म- णून वगैरे कित्येक गोष्टींबद्दल खानवेलकर याचे द्वारें महाराजांस घराकाष्ठेची विनंती केली होती; परंतु त्यांनी त्यांच्या ह्मणण्या पैकी एका कलमास देखील रुकार दिला नव्हती. दाभाभाई यांनीं नुक्तेंच एक बुक छापून प्रसिद्ध केले आहे. त्यांत त्यानीं एका यादीची नकल छापिली आहे. बडोद्याची सर्व राषद आपल्या स्वाधीन करावी म्हणून महाराजाची सही घेण्यासाठी त्यांनीं पंचवीस कलमांची यादी तयार केली आहे, असें कर्नल फेर यांनी झटलें होतें, तीच ही यादी. यांत महाराजांनी त्यांस स्वतंत्रपणे राज्य कारभार चालविण्याकरितां किती अधिकार द्यावा त्याबद्दलची कलमें आहेत. त्यांतच त्यांनीं होरमसजी वाडिया बराबर महाराजांनी आपणास काय सांगून पाठावले त्याबद्दलची आरंभी कलमें लिहिली आहेत, तीं हीं:- - १ सरकारचा हुकूम कोणाच्यानेही बदलवणार नाहीं. २ सरकारच्या मर्जीस येईल तो हुकुम ते देतील. ३ सरकारच्या मर्जीस येईल तसा ते रखर्च करतील. ४ प्रत्येक गोष्टीविषयीं सरकारची परवानगी घ्यावी. ५ सरकारचे हुकूम मात्र दादाभाई यांनीं अमळांत आणावे. कमिशनच्या रिपोर्टावर गवरनर जनरलचा ठराव होण्यापूर्वी पण कमिशनच्या रि- पोटीची नकल मिळाल्यावर देखील महाराजांचे विचार कसे होते हैं त्या कलमांवरू न चांगले ध्यानांत येतें. कमिशनच्या रिपोर्टात त्यांच्या गैरळायकीविषयीं इतकी जबर टीका होती की, त्यांस गवरनर जनरल गादीवर कायम ठेवितात कीं नाहीं, याविषयीं देखील संशय घेण्यासारखे होते. अशा संकटांनीं मल्हारराव महाराज वे-